my friend Imran Khan you win the hearts; Praise by Navjot Singh Sidhu | इम्रान खान तुम्ही हृदय जिंकलात; नवज्योतसिंग सिद्धूंनी केली स्तुती
इम्रान खान तुम्ही हृदय जिंकलात; नवज्योतसिंग सिद्धूंनी केली स्तुती

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्तुती केली आहे. 'तुम्ही हृदय जिंकलात', अशा शब्दांत सिद्धू यांनी खान यांची स्तुती केली आहे.


आज पीओकेमधील करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अभिनेता आणि खासदार सनी देओल आदी उपस्थित होते. नवज्योतसिंग सिद्धू हे देखील या कार्यक्रमाला आले होते. सिद्धू यांनी मोदी यांचेही आभार मानले. मोदी यांनी पुढाकार घेतल्याने करतारपूर साध्य झाला. त्यांना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईल मीठी पाठविली असल्याचे सिद्धू म्हणाले. 


सिद्धू इम्रान खान यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, माझे मित्र इम्रान खान यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. खान यांनी कॉरिडॉर उघडून चार पिढ्यांचे शीखांचे स्वप्न पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजकीय अंतर असले तरीही त्यांचेही आभार मानतो. माझे आयुष्य गांधी परिवारासाठी समर्पित असले तरीही या आड येणार नाही. मी मोदींना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईल मीठी पाठवित आहे. 
तसेच कॉरिडॉर खुले झाल्यानंतर त्यांनी फाळणीनंतर प्रथमच कुंपण उघडल्याचे ते म्हणाले. 

Web Title: my friend Imran Khan you win the hearts; Praise by Navjot Singh Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.