"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:53 PM2021-07-20T19:53:33+5:302021-07-20T20:05:50+5:30

mansukh mandaviya : मनसुख मंडाविया म्हणाले, कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या.

my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya | "माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण केल्याच्या आणि आकडे लपवण्याच्या आरोपाचे खंडन करताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, कोरोना महामारीविषयी कधीही राजकारण केले नाही. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची नोंद राज्ये करीत आहेत. केंद्र सरकारने कधीही कोणत्याही राज्यात कमी प्रकरणे नोंदविण्यास सांगितले नाही. (my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya)

"मी भारत सरकारचा मंत्री आहे, याआधी मी एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी ज्यावेळी कोरोना संकट काळात डॉक्टर म्हणून कोविड वॉर्डात काम करत होती. अशावेळी तिच्या आई-वडिलांची काय परिस्थिती असते? माझ्या मुलीने स्वतःहून सांगितले होते की ती त्या वॉर्डात काम करेल आणि तिने काम सुरू केले. त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले होते. आम्हाला धैर्य मिळाले", असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला टाळी-थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्यावरून विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका करण्यात आली. मनसुख मंडाविया म्हणाले, "कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या. बरेच सदस्य म्हणाले की, केंद्र सरकार कोरोना मृत्यूदराची आकडेवारी लपवत आहे. मात्र राज्य सरकार जे देते तेच केंद्र सरकार प्रकाशित करते. सरकारने कोणालाही कमी आकडेवारी देण्यास सांगितले नाही." 

मनसुख मंडाविया पुढे म्हणाले, "भारतासारखा देश कोणावरही अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि वैज्ञानिकांना त्वरित लसीवर काम करण्याचे निर्देश दिले. भारताने  123 देशांना औषध पुरवठा केला होता, त्यापैकी 64 देशांनी भारताचे आभार मानले होते. ज्यावेळी कोरोनाटी दुसरी लाट चालू होती आणि आम्हाला औषधांची बरीच गरज होती, त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, भारताने आम्हाला त्वरित मदत केली होती, हे आपण विसरू शकत नाही."

Web Title: my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.