शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माझे पूर्वज माकड नव्हते, भाजपाच्या मंत्र्यांचा हास्यास्पद दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 8:20 AM

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केला आहे.

नवी दिल्ली- मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह  यांनी केला आहे. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत येत्या 20 वर्षांत चुकीचा सिद्ध होईल. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याकारणानं मला असं वाटतं मी माझे पूर्वज माकड नव्हते, असं सत्यपाल सिंह म्हणाले आहेत, एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते.कोणत्याही व्यक्तीला दुस-यांच्या विचारांची चेष्टा करण्याचा वैज्ञानिक अधिकार नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपा खासदार सिंह म्हणाले, मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी राहिलो आहे. मी रसायन शास्त्रात पीएचडी केलं आहे. माझ्याविरोधात बोलणारे कोण होते ?, माझ्याबरोबर बरेच लोक असून, आपण सर्वांनाच याचा विचार करावा लागणार आहे. आज नव्हे, तर उद्या आणि उद्याही नाही, तर 10 ते 20 वर्षांत लोकांच्या माझ्या विधानावर विश्वास बसेल. मला असं वाटतं, माझे पूर्व माकड नव्हते, असंही सिंह यांनी सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीही डार्विनच्या सिद्धांतावर सत्यपाल सिंह यांनी टिपण्णी केली होती.आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय, तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डार्विन या शास्त्रज्ञाचा तो सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत  खोटा आणि  अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात 35 वर्षांपूर्वीच सिद्ध केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला. त्यांच्या मुलांना जंगलात नेऊन सोडासत्यपाल सिंह यांचे आणखी एक गमतीशीर विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, पशू, पक्षी आणि जनावरांचा आवाज ऐकून मनुष्य भाषा बोलण्यास शिकला. मी म्हणतो की, असे बोलणार्‍यांच्या मुलांना काही वर्ष जंगलात नेऊन सोडा. बघू, तेथील पशू, पक्ष्यांच्या आवाजावरुन ते कोणती भाषा शिकतात ते’.  सूर्य, पृथ्वी, चंद्राच्या निर्मितीनंतर भगवंतांनी वेदवाणी केली व जगातला मुनष्य तेच वेद पहिले शिकला, असेही ते बोलून गेले. ईश्वराच्या ज्ञानरुपी गंगेतून मनुष्य वेद म्हणण्यास शिकला. हे सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगBJPभाजपा