शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

"शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक", राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 13:12 IST

Rahul Gandhi And Modi Government Over Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. जवळपास दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. 15 जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये नवव्यांदा बैठक होईल.  शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

"शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक" असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच "केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनावश्यक चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न निरर्थक आहे. देशातील अन्नदाता सरकारचा उद्देश जाणत असून त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे कृषी विरोधी कायदे मागे घ्या" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेते पहिल्या बैठकीपासून त्यांच्या या मुख्य मागणीवर ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम नाही. त्यामुळेच आतापर्यंतच्या बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत सरकार कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. तर कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. सरकारनं केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यामुळे अडत्यांची भूमिका संपेल आणि शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा घेतला जीव"

"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला" असं म्हणत याआधीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं. "मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता फक्त विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा" असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी मोदी सरकार हट्ट सोडा हा हॅशटॅग देखील वापरला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा