शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मुस्लिम नेत्याची ऑफर , कमल हसनचं तोंड काळं करणा-याला 25 हजार रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 11:02 AM

हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून एकीकडे अभिनेता कमल हसनवर दक्षिणपंथी हिंदू संघटना जोरदार टीका करत असताना एका मुस्लिम तरूण नेत्याने कमल हसनच्या चेह-यावर काळं फासणा-याला 25 हजार रूपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली

आग्रा : हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून एकीकडे अभिनेता कमल हसनवर दक्षिणपंथी हिंदू संघटना जोरदार टीका करत असताना उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील एका मुस्लिम तरूण नेत्याने कमल हसनच्या चेह-यावर काळं फासणा-याला 25 हजार रूपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.  अलीगड येथील मुस्लिम यूथ असोसिएशन प्रेसिडेंट मोहम्मद आमिर राशिदने कमल हसनवर टीका केली आहे. कमल हसन देशद्रोही असल्याचं त्याने म्हटलंय. कमल हसन जाणूनबुजून हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणात येणार असल्यामुळे कमल हसन असे वक्तव्य करत आहेत. जो कोणी त्यांच्या चेह-यावर काळं फासेल त्याला मी 25 हजार रूपये देईन असं रशिद म्हणाले.   तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून चर्चेत आलेला अभिनेता कमल हसन याने आपल्या विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. पण आता तुरूंगातच जागा शिल्लक राहिली नसल्याने ते मला गोळ्या मारून संपवण्याची भाषा करत आहेत अशी खोचक टीका कमल हसनने केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कमल हसनचं हे वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर आलं आहे.  कमल हसन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने काल म्हटलं. 'कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले आहेत. कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू दहशतवादावर परखड मत मांडले होते. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात, अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी  लेखात केली होती. एका मासिकासाठी त्यांनी हा लेख लिहीला होता. कमल हसन यांच्या टीकेवरुन वाद निर्माण झाला होता.  

टॅग्स :Kamal Hassanकमल हसनHinduismहिंदुइझमHindutvaहिंदुत्व