शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूबहुल भागात मुस्लिम उद्योजक बांधतायत मशीद

By admin | Updated: August 20, 2014 14:38 IST

जयपूरमधील मुस्लिम उद्योजक हिंदूबहुल भागातील गरिब हिंदूंच्या जमिनी विकत घेऊन त्यावर मशीद बांधत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २० - जयपूरमधील मुस्लिम उद्योजक हिंदूबहुल भागातील गरिब हिंदूंच्या जमिनी विकत घेऊन त्यावर मशीद बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (गुप्तवार्ता) तयार केलेल्या गोपनीय अहवालातून ही माहिती समोर आली असून पीपल युनियन फॉर सिव्हील लिबर्टीस (पीयूसीएल) या संस्थेने पोलिसांच्या या गोपनीय अहवालाच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 
राजस्थानमधील अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तवार्ता) यू. आर. साहू यांनी जयपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना नुकताच एक गोपनीय अहवाल पाठवला आहे. 'जयपूरमधील हिंदूबहूल भागातील गरिब हिंदूंना मुस्लिम उद्योजक पैशांचे आमीष दाखवून त्यांच्या जमिनी विकत घेत आहेत. या जमिनींवर काही दिवसांनी मशीदी बांधल्या जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या प्रकाराविषयी स्थानिक सरकारी यंत्रणांनी दक्ष राहावे असा इशाराही अहवालात देण्यात आला असून यासंदर्भात स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी चौकशी करुन योग्य कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहे. 
जमात ए इस्लामी हिंदचे डॉ. इक्बाल, मुस्लिम उद्योजक हबीब गरनेत, श्रीयाज तकत, हाजी रफत, नईम कुरेशी, पप्पू कुरेशी, गफ्फर भाई टेंटवाला अशा अनेक उद्योजकांची नावेही या अहवालात आल्याने खळबळ माजली आहे. 
दरम्यान, पीयूसीएल या संघटनेने पोलिसांच्या अहवालातील आक्षेप फेटाळून लावले आहे. 'मुस्लिम उद्योजकांनी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात कोणताही घोटाळा नसून पोलिसांचा हा गोपनीय अहवाल कसा फुटला याची चौकशी करावी अशी मागणीही संघटनेच्या पदाधिका-यांनी केली आहे.