Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:04 IST2025-04-15T11:04:12+5:302025-04-15T11:04:31+5:30

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Murshidabad Violence questions raised on west bengal government bsf bjp victims ordeal | Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुत्ती, धुलियान, जंगीपूर आणि शमशेरगंज या भागात वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी हिंसाचाराची सुरुवात झाली. यामध्ये अनेक दुकानं आणि घरं जाळण्यात आली.

हिंसाचाराने प्रभावित झालेल्या लोकांच्या कथा हृदयद्रावक आहेत. एका स्थानिक व्यक्तीने एएनआयला सांगितलं की, सर्व काही जळून खाक झालं आहे, काहीही शिल्लक नाही... अनेक कुटुंबांनी आपलं घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. खुशबू दास म्हणाल्या की, आमची दुकानं आणि घरं जाळली गेली आहेत. पोलिसांनी मदत केली नाही, आम्हाला बीएसएफ कॅम्प हवा आहे.

"आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी"

मुर्शिदाबादमधील धुलियान येथील रहिवासी प्राजक्ता दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे आणि ही परिस्थिती का उद्भवली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत.

"घरांना आग, लोकांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड..."

"आज मुर्शिदाबादचे लोक आणि मुलं म्हणत आहेत की, बीएसएफ त्यांच्यासाठी देवासारखे आहेत कारण बीएसएफने त्यांना वाचवलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीतही, घरांना आग लावण्यात आली, लोकांवर हल्ले करण्यात आले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांनी काहीही केलं नाही" असं भाजपाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी म्हटलं आहे.

“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ३२ वर्षीय पिंकी दासने हल्ल्यादरम्यान असलेल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं. "हल्लेखोर आले, हल्ला सुरू झाल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. माझे पती आणि सासरे यांची हत्या केली गेली. त्यांचे मृतदेह आमच्या घराजवळ तीन तास पडले होते."
 

Web Title: Murshidabad Violence questions raised on west bengal government bsf bjp victims ordeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.