शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

'मर्सल' सिनेमाचा वाद पेटला, राहुल गांधींनी टि्वट करुन मोदींना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 4:03 PM

मर्सल' या तामिळ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

नवी दिल्ली - 'मर्सल' या तामिळ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मर्सल चित्रपटातून जीएसटी कररचना आणि डिजिटल इंडिया या मोदी सरकारच्या दोन महत्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने या दृश्यांवर आक्षेप घेत ही सीन्स चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वट करुन या चित्रपटाला समर्थन दिले आहे. 

मोदी मर्सल सिनेमा तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तामिळ अभिमानावर बंदी आणू नका असे टि्वट राहुल यांनी केले आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या मर्सल सिनेमात जीएसटीचा उल्लेख आहे. भाजपाला सिनेमातील हे दृश्य अजिबात आवडले नसून, त्यांनी आक्षेप घेत सीन कट करण्याची मागणी केली आहे. 

मी हा चित्रपट बघितलेला नाही. पण ज्या लोकांनी हा चित्रपट बघितला  त्यांना जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटते. जीएसटीचा धोरणात्मक निर्णय होता. केंद्र सरकारने भरपूर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला. सेलिब्रिटीनी अशी चुकीची विधाने करु नयेत असे तामिलीसाई सौदराजन म्हणाल्या. त्या तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी