देशातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईच पहिली; लखनौचा प्रथमच सहभाग, मालमत्ता महागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:10 IST2025-08-11T10:09:22+5:302025-08-11T10:10:25+5:30
जमिनीच्या दरांत ३० ते १३० टक्क्यांनी झाली वाढ

देशातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईच पहिली; लखनौचा प्रथमच सहभाग, मालमत्ता महागणार
लखनौ : देशातील सर्वात महागड्या दहा शहरांमध्ये मुंबई देशातील नंबर एक स्थानी कायम आहे. मात्र, यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहराचा समावेश प्रथमच झाला आहे. १ ऑगस्ट रोजी लागू झालेल्या नवीन सर्किल रेटमुळे मुंबईचा देशातील सर्वांत महागड्या दहा शहरांमध्ये पुन्हा प्रथम क्रमांक आला आहे. उत्तर प्रदेशात नोएडा व गाझियाबाद हे सर्वात महागडी शहरे आहेत. जिल्हा प्रशासनाने दहा वर्षांनंतर लखनौच्या सर्किल रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या शहरातील जमीन, घर, दुकान खरेदी अधिक शुल्क लागेल.
जमिनीच्या दरांत ३० ते १३० टक्क्यांनी झाली वाढ
शहरातील गौतमपल्ली, गोमती नगर, अंसल, आलमबाग, वृंदावन योजना, महानगर आणि हजरतगंज या भागांत ३०% ते १३०% दरवाढ झाली आहे. शहरातील गोमती नगरमध्ये जमिनीचे दर ३३ हजार प्रतिचौरस मीटरवरून ७७हजार प्रति चौ. मी. झाले आहेत.