शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - अहमदाबाद मार्गावर धावणार पहिली बुलेट ट्रेन

By admin | Published: July 08, 2014 1:28 PM

मुंबई-अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पहिल्या रेल्वे बजेटमध्ये केली.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ८ -  मुंबई - अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पहिल्या रेल्वे बजेटमध्ये केली. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई ही देशातील महत्वाची शहरे जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर गौडा यांनी मंगळवारी बुलेट ट्रेनची घोषणा केली. ३२० किमी प्रतितास या वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबाद दरम्यानचे ५३४ किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासांत पार करेल. 
आपल्या बजेटमध्ये सदानंद गौडा यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी ४ हजार महिला पोलिसांची भरती, ए-१ व ए कॅटॅगरीतील स्थानकांवर व विशेष गाड्यांमध्ये वाय-फायची सुविधा. रेल्वेतील शिक्षणासाठी खास रेल्वे विद्यापीठ सुरू करणार असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये नमूद केले आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही.
महाराष्ट्रासाठी काय ?
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी येत्या २ वर्षांत मुंबईसाठी ८६४ ईएमयू (EMU) लोकलची घोषणा केल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कसारा- इगतपुरीदरम्यान चौथा ट्रॅक सुरू करण्यात येणार असून औरंगाबाद- चाळीसगाव नव्या मार्गाचे सर्वेक्षण होणार आहे.  चंद्रपूर- नागभीड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून कर्जत - लोणावऴा नवी लाईन सुरू करण्यात येणार आहे. तसेच आठवड्यातून एकदा नागपूर- पुणे गाडी सुरू होईल. तसेच कर्नाटक व महाराष्ट्राला जोडण्यासाठी गदग-पंढरपूर विशेष गाडीची  ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. 
 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ब-याच कालावधीनंतर ख-या अर्थाने भारतीय रेल्वे बजेट मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. हे बजेट नागरिकांना अधिक सुरक्षा आणि सुविधा देणारे असल्याचेही ते म्हणाले.
 रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे : 
- भारतीय रेल्वे अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. 
- रोज २ कोटी ३० लाख नागरिक रेल्वेने प्रवास करतात. 
- जगातील सर्वाधिक मालवाहतूक भारतीय रेल्वेद्वारे व्हावी, हा प्रयत्न राहील.
- संरक्षण क्षेत्रात साधने पुरवण्यात रेल्वेची महत्वाची भूमिका.
- रेल्वेला नवीन प्रोजेक्ट्ससाठी १ लाख ८२ हजार कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वेमध्ये परकीय गुंतवणुकीची (FDI) आवश्यकता.
- एका बुलेट ट्रेनसाठी ६० हजार कोटींची गरज.
- १ रुपया कमवल्यावर रेल्वेचे ९४ पैसे खर्च होतात. 
- रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणात आतापर्यंत अक्षम्य दुर्लक्ष  झाले. 
- मुंबई - अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन सुरू करणार.
- पाच वर्षांत रेल्वे कागद विरहीत करणार.
- पर्यटनासाठी जाहिरातीमधून पैसे मिळविण्याची योजना.
- महिलांच्या सुरक्षेसाठी ४ हजार महिला कॉन्स्टेबल भरती करणार. 
- २७ नवीन रेल्वे सुरू होणार. ५ नव्या जनसाधारण, ५ प्रीमियम गाड्या सुरू करण्यात येणार
- आत्तापर्यंत ३५९ योजना प्रलंबित आहेत. गेल्या १० वर्षात भारतीय रेल्वेने ४१ हजार कोटी रूपये खर्चून ३७०० किमीचे नवे रूळ टाकले. 
- रेल्वे योजना पीपीपीद्वारे पूर्ण करणार.
- सर्व रेल्वे स्थानकांवर पीपीपीच्या माध्यमातून पूल, लिफ्ट व एस्केलेटर बनवणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवर चालणारी कार चालवली जाणार - रेल्वेमंत्री.
- सुरक्षेसाठी प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार.
- पिण्याचे पाणी आणि स्वच्छता देण्यावर भर देण्यात येणार
- गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेले चार प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाही. 
- सामाजिक दायित्वाच्या योजनांनी काही फायदा होत नाही. रेल्वेची आर्थिक नीती सुधारण्याची गरज. 
- रेल्वे बजेटमध्ये प्रवासी व माल वाहतुकीत कोणतीही भाडेवाढ नाही.
- मानवरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू करणार.  
- लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बायोटॉयलेटसची सुविधा असेल.
- मुंबईतील पासच्या किंमती कमी केल्याने ६१० कोटींचा तोटा झाला.
- रेल्वेचा फायदा ४२०० कोटींनी कमी झाल्याने अनेक प्रकल्प रखडले.
- ऑनलाईन बुकींगला प्राधान्य देणार.
- अन्नपुरवठा करणा-या कंत्राटदाराबद्दल तक्रार आल्यास कंत्राट त्वरित रद्द करणार.
- ट्रेनमध्ये खाण्याची ऑर्डर एसएमएसद्वारे देता येणार. 
- सुरक्षेसाठी प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार.
- व्यावसायिकांसाठी निवडक गाड्यांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करून देणार.
- रेल्वेतील शिक्षणासाठी खास रेल्वे विद्यापीठ सुरू करणार. 
- मालवाहतुकीत ४.९टक्के वाढीचे उद्दिष्ट आहे. 
-  रेल्वेतील भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी 'रेडी टू इट' सुविधा सुरू करणार. 
- 'ए-1' व 'ए' कॅटॅगरीतील स्टेशन्सवर व काही निवडक गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणार.
- तिकीट बुकिंगची सुविधा वाढवणार. इंटरनेट बुकिंगमध्येही सुधारणा करणार. 
- पोस्ट ऑफीसमध्येही मिळणार रेल्वे तिकीट्स.
- ९ मार्गांवर हायस्पीड ट्रेन सुरू करणार. दिल्ली-चंदीगड, दिल्ली-आग्रा, दिल्ली-पठाणकोट, दिल्ली- कानपूर, नागपूर-विलासपूर, चैन्नई-हैदराबाद, मुंबई-अहमदाबाद, नागपूर-सिकंदराबाद  दरम्यान १६० ते २०० किमी प्रती तास वेगाने ट्रेन धावणार.
- कसारा- इगतपुरीदरम्यान चौथा ट्रॅक सुरू करणार. औरंगाबाद- चाळीसगाव नव्या मार्गाचे सर्वेक्षण करणार. चंद्रपूर- नागभीड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणार.
-  कर्नाटक व महाराष्ट्राला जोडण्यासाठी गदग-पंढरपूर विशेष गाडी. 
- लोकल रेल्वे गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवणार. 
- रेल्वे कर्मचा-यांचे पीएफ ५०० वरून वाढवून ८०० रूपये होणार.