अल्पवयीन मुलींचे अनेक वेळा लग्न, टोळीचा पर्दाफाश; बनावट लग्न लावून वराकडून लाखो उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:04 IST2023-01-30T06:58:45+5:302023-01-30T07:04:46+5:30
Marriage: अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांचे विवाह लावून देणाऱ्या टोळीचा हरियाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट लग्न लावून देण्याच्या या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पती-पत्नीला अटक करून गजाआड करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलींचे अनेक वेळा लग्न, टोळीचा पर्दाफाश; बनावट लग्न लावून वराकडून लाखो उकळले
चंडीगड : अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांचे विवाह लावून देणाऱ्या टोळीचा हरियाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट लग्न लावून देण्याच्या या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पती-पत्नीला अटक करून गजाआड करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस महिलेसह अन्य दोघांचा शोध घेत आहेत. आरोपी रीना आणि विकी हे लुधियानाचे रहिवासी असून, दिल्लीत भाड्याने राहत होते.
एका महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिची सून सपना कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. बेपत्ता सपनाचा विवाह जिंदच्या मोनूशी झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सपनाला गाझियाबाद जिल्ह्यातून गजाआड केले. सपनाने सांगितले की, तिचे खरे नाव स्वर्णलता आहे आणि तिने स्वतःच्या इच्छेने घर सोडले होते. तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले,
सपना उर्फ स्वर्णलताचा २००२ मध्ये विवाह झाला होता. तिची रीना नावाच्या महिलेशी भेट झाली. नकार दिल्यास स्वर्णलता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीने तिने लग्न केले. यापूर्वी तिचे लग्न राजस्थानमध्येही झाले होते. पुन्हा एकदा हरियाणात लग्न करण्यास भाग पाडले. प्रत्येक वेळी तिला घरी आणण्याच्या नावाखाली सासरकडून आणले जायचे आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा लग्न केले जायचे.
बनावट आधार कार्ड...
रीना, तिचा नवरा मुलींसाठी स्वतंत्र आधार कार्ड काढायचे. आरोपींच्या फोनमधून पीडितांच्या वेगवेगळ्या नावांची बनावट आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. सर्व पीडितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. लग्न लावण्यासाठी आरोपी वराकडून लाखो रुपये घेत असत.