पुढील पाच वर्षांत गुजरातमध्ये गुंतवणूक ७ लाख कोटींवर नेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:44 IST2026-01-13T09:44:35+5:302026-01-13T09:44:35+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा

पुढील पाच वर्षांत गुजरातमध्ये गुंतवणूक ७ लाख कोटींवर नेणार
राजकोट : रिलायन्स हा याआधीच गुजरातमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातमध्ये आम्ही ३.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली होती. पुढील पाच वर्षात ही गुंतवणूक दुप्पट करून ७ लाख कोटी रुपयांवर नेण्यात येईल. त्यामुळे प्रचंड रोजगार निर्माण होईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
राजकोट येथे आयोजित व्हायब्रेट गुजरात प्रादेशिक परिषद, कच्छ आणि सौराष्ट्र विभाग या कार्यक्रमात अंबानी यांनी रविवारी सांगितले की, जामनगर येथे आम्ही जगातील सर्वांत मोठी एकात्मिक स्वच्छ उर्जा परिसंस्था उभारत आहोत. जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला आमचा मल्टी- गिगावॅट, युटिलिटी स्केल सौर प्रकल्प प्रगत साठवण प्रणाली आणि आधुनिक ग्रिड एकत्रीकरणाद्वारे अहोरात्र स्वच्छ उर्जा पुरवेल.