MLA च्या मुलीला ‘थार’ गाडी देण्यासाठी खासदार सनी देओलचं थेट महिंद्रा कंपनीला पत्र, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:28 AM2021-08-13T08:28:06+5:302021-08-13T08:30:00+5:30

लोकसभा मतदारसंघात सनी देओल नेहमी वादग्रस्त मुद्द्यावरुन चर्चेत असतात. जेव्हा सनी देओल लोकसभा निवडणुकीत उभे राहून जिंकून आले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले.

MP Sunny Deol letter directly to Mahindra company to give 'Thar' car to MLA's daughter | MLA च्या मुलीला ‘थार’ गाडी देण्यासाठी खासदार सनी देओलचं थेट महिंद्रा कंपनीला पत्र, कारण...

MLA च्या मुलीला ‘थार’ गाडी देण्यासाठी खासदार सनी देओलचं थेट महिंद्रा कंपनीला पत्र, कारण...

Next
ठळक मुद्देदेओल यांनी मतदारांकडे पाठ फिरवल्याने परिसरात ठिकठिकाणी सनीचे बेपत्ता झाल्याचे बॅनर्स झळकले होते. आमदाराच्या मुलीला तातडीनं थार गाडी देण्याचा आग्रह सनी देओलनं केल्यानं लोकांमध्ये आणखी संताप वाढला एक पत्र त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहावं ज्यात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवाहन करावं.

गुरुदासपूर – पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा जागेवरुन निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं लिहिलेली एक पत्र सध्या चर्चेत आलं आहे. सनी देओलनं सुजानपूरचे आमदार दिनेश सिंह बब्बू यांना थार गाडी देण्यासाठी थेट महिंद्रा कंपनीला पत्र लिहिलं आहे. थार गाडी लवकरात लवकर पोहचवण्याची व्यवस्था करावी असं सनी देओलनं पत्रात म्हटलं आहे.

लोकसभा मतदारसंघात सनी देओल नेहमी वादग्रस्त मुद्द्यावरुन चर्चेत असतात. जेव्हा सनी देओल लोकसभा निवडणुकीत उभे राहून जिंकून आले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. सनी देओल यांनी मतदारांकडे पाठ फिरवल्याने परिसरात ठिकठिकाणी सनीचे बेपत्ता झाल्याचे बॅनर्स झळकले होते. सनी देओल खासदार बनले असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठलीही जबाबदारी घेतली नसल्याचा राग लोकांच्या मनात आहे.

आता आमदाराच्या मुलीला तातडीनं थार गाडी देण्याचा आग्रह सनी देओलनं केल्यानं लोकांमध्ये आणखी संताप वाढला आहे. विरोधी पक्षांनी महिंद्रा कंपनीला लिहिलेल्या या पत्रावरुन निशाणा साधला आहे. स्थानिक लोक म्हणतात की, खासदार आमदरांच्या मुलीसाठी पत्र लिहू शकतात परंतु जनतेच्या कामासाठी काहीच करत नाही. तर गुरुदासपूरमध्ये राहणाऱ्या एक स्थानिक व्यक्ती वरुण कोहली यांनी म्हटलंय की, खासदार सनी देओल यांनी आमदाराच्या मदतीसाठी महिंद्रा कंपनीला पत्र पाठवलं. आमची इच्छा आहे एक पत्र त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहावं ज्यात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवाहन करावं. सनी देओलनं हे सिद्ध करायला हवं की, गुरुदासपूरच्या जनतेने ज्या व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत जिंकवून संसदेत पाठवलं. तो लोकांचा आवाज लोकसभेत उपस्थित करत आहे.

भाजपा नेत्यानेही काढला चिमटा

दुसरीकडे भाजपाचे माजी मंत्री मोहन लाल यांनी नेत्यांना सल्ला दिलाय की, जनतेने तुम्हाला लोकांचे भले करण्यासाठी निवडून दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांचा आवाज बनाल. लोकांच्या मागण्या संसदेपर्यंत पोहचवाल. केवळ स्वत:च्या कुटुंबाची काळजी करण्याकडे लक्ष देऊ नका.

....म्हणून केली सनी देओलनं शिफारस

सुजानपूर मतदारसंघातील आमदार दिनेश सिंह ठाकूर उर्फ बब्बू यांच्या मुलीनं महिंद्रा थार गाडी बुक केली होती. ही गाडी आउट ऑफ टर्न देण्यासाठी खासदार सनी देओलनं कार उत्पादन करणारी कंपनी महिंद्राच्या अधिकाऱ्यांना शिफारस पाठवलं. प्राधान्याने थार गाडी आमदाराच्या मुलीला देण्याची व्यवस्था करावी अशी शिफारस त्यांनी पत्रातून केली होती. त्यामुळे इंटरनेटवर नेटिझन्सकडून सनी देओलची खिल्ली उडवण्यात आली.

Web Title: MP Sunny Deol letter directly to Mahindra company to give 'Thar' car to MLA's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app