पहिल्या दोन पत्नी 'कलेक्टर'! आता IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा विवाह, ती आहे डेप्युटी सेक्रेटरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:27 IST2026-02-16T10:25:29+5:302026-02-16T10:27:16+5:30

MP IAS Avi Prasad Third Marriage with Ankita Dhakre: मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी अवि प्रसाद यांनी तिसरा विवाह केला आहे. त्यांच्या पहिल्या दोन पत्नी रिजु बाफना आणि मिशा सिंह या जिल्हाधिकारी आहेत, तर तिसरी पत्नी अंकिता धाकरे डेप्युटी सेक्रेटरी आहेत.

MP IAS Avi Prasad Third Marriage with Ankita Dhakre: First two wives were 'Collectors'! Now IAS Avi Prasad has married for the third time, she is a Deputy Secretary... | पहिल्या दोन पत्नी 'कलेक्टर'! आता IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा विवाह, ती आहे डेप्युटी सेक्रेटरी...

पहिल्या दोन पत्नी 'कलेक्टर'! आता IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा विवाह, ती आहे डेप्युटी सेक्रेटरी...

भोपाळ: मध्य प्रदेशमधील एक नामांकित आणि कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अवि प्रसाद सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे, तर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. २०१४ बॅचचे अधिकारी अवि प्रसाद यांनी नुकताच तिसरा विवाह केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तिन्ही पत्नी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी अवि प्रसाद यांनी २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी विवाह केला. हा विवाह सोहळा कुनो नॅशनल पार्क येथे मोठ्या तामझामात पार पडला. अंकिता धाकरे या सध्या राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी (उपसचिव) म्हणून कार्यरत आहेत.

माजी पत्नीही आहेत 'जिल्हाधिकारी'
अवि प्रसाद यांचे पहिले दोन विवाह देखील आयएएस अधिकाऱ्यांशीच झाले होते. अवि प्रसाद यांची पहिली पत्नी रिजु बाफना २०१४ बॅचच्या अधिकारी असून, त्या सध्या शाजापूरच्या जिल्हाधिकारी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. अवि प्रसाद यांचा दुसरा विवाह २०१६ बॅचच्या अधिकारी मिशा सिंह यांच्याशी झाला होता. मिशा सिंह या सध्या रतलामच्या जिल्हाधिकारी आहेत. गेल्या वर्षीच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

कोण आहेत अवि प्रसाद?
अवि प्रसाद हे मूळचे उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहेत. २०१४ च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशात १३ वी रँक मिळवली होती. सध्या ते मध्य प्रदेश रोजगार हमी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. कटनीचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी कुपोषणाविरोधात राबवलेल्या मोहिमेचे राज्यभर कौतुक झाले होते. प्रशासकीय वर्तुळात या लग्नाची आणि अवि प्रसाद यांच्या तिन्ही आयएएस पत्नींची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title : IAS अवि प्रसाद ने तीसरी बार रचाई शादी, तीनों पत्नियाँ हैं IAS अधिकारी

Web Summary : मध्य प्रदेश के आईएएस अधिकारी अवि प्रसाद ने तीसरी शादी की। खास बात है कि उनकी तीनों पत्नियाँ आईएएस अधिकारी हैं। उन्होंने अंकिता धाकरे से विवाह किया। उनकी पहली दो पत्नियाँ भी आईएएस अधिकारी हैं और वर्तमान में जिला कलेक्टर के पद पर हैं।

Web Title : IAS officer Avi Prasad marries third time; all wives are IAS

Web Summary : IAS officer Avi Prasad, known for his work in Madhya Pradesh, recently married for the third time. Remarkably, all three of his wives are IAS officers. His latest marriage was with IAS Ankita Dhakre. His previous wives are also district collectors.