केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:17 IST2021-02-10T18:14:20+5:302021-02-10T18:17:41+5:30
Gautam Gambhir Jan Rasoi : सर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई'

केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीतील न्यू अशोक नगर या भागात जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली आहे. यापूर्वीही त्यांनी एका जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली होती. गौतम गंभीर यांनी गेल्या वर्षी २४ डिसेंबर २०२० रोजी आपल्या भागात जन रसोईची सुरूवात केली होती. गौतम गंभीर फाऊंडेशनद्वारे लोकांना या ठिकाणी केवळ एका रूपयात पोटभर जेवण उपलब्ध करून देण्यात येतं.
दिल्लीत आतापर्यंत दोन ठिकाणी जन रसोई या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं.
पेट भरा हो तो इंसान दुनिया की किसी भी ताकत से भिड़ सकता!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 9, 2021
दिल्ली को प्रचार नहीं, आहार चाहिए! #DelhiSecondJanRasoi@PandaJay@adeshguptabjppic.twitter.com/rjRHM4p83J
डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवात
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जातं. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते.
With the opening of second Jan Rasoi in Ashok Nagar, we will now be able to feed around 2000 people daily with clean and nutritious food! #DelhiSecondJanRasoi#FoodForAllpic.twitter.com/LrZHfN3Xdf
— Gautam Gambhir Foundation (@ggf_india) February 9, 2021
यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे.