कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:45 IST2021-05-24T14:44:31+5:302021-05-24T14:45:19+5:30

The father also died after the death of two young children : अतर सिंगच्या कुटूंबात एक मुलगा असून आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

A mountain of sadness fell on the family; The father also died after the death of two young children | कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू 

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू 

ठळक मुद्देगावात सतत होणाऱ्या मृत्यूनंतर लोक भयभीत झाले आहेत. त्याचबरोबर एकाच कुटुंबात तिघांचा मृत्यू झाल्याने गावातही शोककळा पसरली आहे.

गौतम बुध नगरच्या ग्रेटर नोएडा वेस्टमधील कुटूंबावर कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ९ मे रोजी जलालपूर गावात पाच तासात दोन भावांचा मृत्यू झाला. दोन लहान मुलांच्या मृत्यूनंतर धक्का बसलेले वडील देखील मुलांच्या निधनाच्या दुःखातून बाहेर येऊ शकले नाही. अखेर शनिवारी त्यांचेही निधन झाले. गावात सतत होणाऱ्या मृत्यूनंतर लोक भयभीत झाले आहेत. त्याचबरोबर एकाच कुटुंबात तिघांचा मृत्यू झाल्याने गावातही शोककळा पसरली आहे. अतर सिंगच्या कुटूंबात एक मुलगा असून आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


रोजा जलालपूर गावात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, गावातील लोकांमध्येच दहशत आहे असे नाही तर आजूबाजूच्या खेड्यांमध्येही कोरोना विषाणूबद्दल भयभीत वातावरण आहे. ९ मे रोजी पंकज आणि दीपक हे दोन सख्खे भाऊ त्याच दिवशी ५ तासाच्या अंतराने मरण पावले. अतर सिंग हे वडील एका मुलाच्या चितेला अग्नी देऊन परतले नाहीत तोवर दुसरा मुलगाही मरण पावला. काही तासांतच आपल्या दोन मुलांना गमावलेल्या अतर सिंग यांना हा धक्का सहन करता आला नाही. गेल्या शनिवारी अतर सिंग यांचेही निधन झाले. ते ही कोरोना पॉझिटिव्ह होते असं सांगितलं जात आहे.

Web Title: A mountain of sadness fell on the family; The father also died after the death of two young children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.