हृदयस्पर्शी! आईला ब्रेन हॅमरेज, वडिलांना कॅन्सर; एका सिलिंडरसाठी लेकाची २०० किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:58 IST2026-03-19T12:56:46+5:302026-03-19T12:58:15+5:30

माळी म्हणून काम करणारे अरुण आपल्या आजारी आई-वडिलांसाठी सिलिंडरची सोय व्हावी, यासाठी तब्बल २०० किलोमीटरचा प्रवास करून आपल्या बरेठी या मूळ गावी पोहोचले. 

mother suffers brain hemorrhage father has cancer son travels 200 km for gas cylinder | हृदयस्पर्शी! आईला ब्रेन हॅमरेज, वडिलांना कॅन्सर; एका सिलिंडरसाठी लेकाची २०० किमी पायपीट

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील बाराबंकीचे रहिवासी असलेले अरुण कुमार पहाटे ३ वाजेपासून 'अमित गॅस एजन्सी'बाहेर रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. शहाजहानपूरमध्ये माळी म्हणून काम करणारे अरुण आपल्या आजारी आई-वडिलांसाठी सिलिंडरची सोय व्हावी, यासाठी तब्बल २०० किलोमीटरचा प्रवास करून आपल्या बरेठी या मूळ गावी पोहोचले. 

अरुण यांचे वडील कॅन्सरशी, तर आई ब्रेन हॅमरेजसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. घरातील सिलिंडर संपल्यामुळे त्यांच्या घरी जेवण बनवू शकत नाही. बुकिंग करून चार-पाच दिवस उलटूनही सिलिंडर न मिळाल्याने, ते रात्री २ वाजता घरातून निघाले आणि ८ किलोमीटर पायपीट करत पहाटेच गॅस एजन्सीवर पोहोचले.

अरुण यांच्या हतबलतेचा अंदाज यावरून लावता येईल की, घरातील दोन्ही ज्येष्ठ व्यक्ती अंथरुणाला खिळलेल्या आहेत. आईला ब्रेन हॅमरेज झालं आहे आणि वडील कॅन्सरशी लढत आहेत. शहाजहानपूरमध्ये मजुरी करणाऱ्या अरुण यांना जेव्हा समजलं की घरात जेवण बनवणं शक्य नाही, तेव्हा ते सर्व काम सोडून गावाकडे धावले.

मुलाने सांगितलं की, "सिलिंडरच्या किमती आणि टंचाई इतकी वाढली आहे की, गरीब माणसासाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करणं हे आता एक मोठं आव्हान बनलं आहे." अरुण यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गॅस एजन्सी सकाळी १० वाजता उघडते, पण अरुण यांच्यासारखे अनेक लोक पहाटे ३ वाजल्यापासूनच रांगेत उभे राहतात. उशिरा पोहोचलो तर आपला नंबर येणार नाही, अशी भीती अरुण यांना वाटत होती. त्यांनी चार-पाच दिवसांपूर्वीच बुकिंग केलं होतं, परंतु तरीही त्यांना रिकाम्या हातानेच परतावं लागलं होतं. एजन्सीबाहेर लागलेल्या या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Web Title : बीमार माता-पिता के लिए सिलेंडर हेतु पुत्र की २०० किमी पैदल यात्रा

Web Summary : अरुण कुमार अपने बीमार माता-पिता के लिए गैस सिलेंडर लेने 200 किमी पैदल चले। उनके पिता कैंसर से और माँ ब्रेन हेमरेज से पीड़ित हैं। सिलेंडर खाली होने से खाना बनाना मुश्किल हो गया। ईंधन की कमी उजागर करते हुए वह सुबह से लाइन में लगे रहे।

Web Title : Desperate Son Walks 200km for Cylinder Amid Parents' Illness

Web Summary : Arun Kumar walked 200km for a gas cylinder for his ailing parents. His father battles cancer, and his mother suffers from a brain hemorrhage. With empty cylinders, cooking became impossible. He queued before dawn, highlighting fuel scarcity hardships.