संतापजनक! आईने तिला पाच वेळा विकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:49 IST2018-03-21T12:49:54+5:302018-03-21T12:49:54+5:30
आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे.

संतापजनक! आईने तिला पाच वेळा विकले
गाझियाबाद - आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे. सावत्र आईने आपल्याला पाचवेळा पाच वेगवेगळ्या लोकांना विकल्याचा धक्कादायक आरोप एका दहा वर्षांच्या चिमुकलीने केला आहे. खरेदी केलेल्या लोकांनी आपणास भीक मागायला लावली. तसेच आपले लैंगिक शोषणही केले, असा आरोप या पीडित मुलीने केला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच सीडब्ल्यूसीने लोनी पोलीस ठाण्याला पत्र लिहून संबंधित आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सीडब्ल्यूसीच्या सदस्या शालिनी सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलीने आपल्या जबाबामध्ये आपल्याला आईने अनेक वेळा विकल्याचे सांगितले. तसेच घरी वडील आपल्याल सिगारेटचे चटके देत अशी माहितीही तिने दिली. हा प्रकार मानवी तस्करीचा वाटत असून, यासंदर्भात अन्य विभागांनाही पत्र पाठवले जाईल,"
लोनी येथे राहणाऱ्या या मुलीला 18 डिसेंबरला जयपूर येथून गाझियाबाद येथे आणण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. मात्र आपल्या वडलांना पाहून तिला रडू कोसळले. त्यावेळी तिला एकांतात नेऊन चौकशी केली असता तिने सगळी माहिती पोलिसांना सांगितली. आईच्या मृत्यूनंतर वडलांनी आपला छळ केला. तर सावत्र आईने आपली वारंवार विक्री केल्याचा आरोप तिने केला. सदर महिला या मुलीला आपल्या परिचयातील लोकांकडून विकायची. त्यानंतर फिर्याद झाल्यावर पोलीस तिला शोधून पुन्हा घरी आणून सोडायचे. मग या मुलीला पुन्हा विकले जायचे. अशाप्रकारे या मुलीची आतापर्यंत पाच वेळा विकण्यात आले.