"त्रास दिलात तर..."; ३ मुलांची आई ३ लाख अन् ६ तोळं सोनं घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:11 IST2025-03-03T16:10:56+5:302025-03-03T16:11:14+5:30
तीन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे.

"त्रास दिलात तर..."; ३ मुलांची आई ३ लाख अन् ६ तोळं सोनं घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये तीन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे. प्रेमात ती इतकी वेडी झाली की नवरा आणि तीन मुलांना सोडून गेली आहे आणि कोर्ट मॅरेजही केलं आहे. पळून जाण्यापूर्वी तिने सासरच्या घरामध्ये ठेवलेले ३ लाख रुपये आणि ६ तोळे सोनंही नेल्याचा आरोप आहे.
सोशल मीडियावर आता महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये महिला तिच्या पतीला आणि कुटुंबातील सदस्यांना धमकावताना दिसत आहे. महिलेने तिच्या सासरच्यांना इशारा दिला आहे की, जर माझा पाठलाग केलात तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.
बिजनौरच्या बधापूर गावात ही घटना घडली आहे. विवाहित महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. तिने बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत, ज्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कोर्टात लग्न केल्याचं महिलेने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
महिलेचा आरोप आहे की, तिचा पहिला नवरा तिला त्रास द्यायचा, म्हणून तिने त्याला सोडून दिलं. तिने तिच्या कुटुंबाला आणि पोलिसांना तिच्या बॉयफ्रेंडला त्रास देऊ नका असं आवाहन केलं आहे. जर त्याला त्रास दिला गेला तर त्या लोकांवर केस करेन किंवा इतर काही कारवाई करेल असंही म्हटलं.
मला माझ्या मुलांची आठवण येते. मुलांना सोडणं सोपं नाही. पण माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला. तो मला, माझ्या बहिणींना आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करायचा. या सगळ्याला कंटाळून मी माझ्या आईवडिलांशी आणि सासरच्यांशी असलेलं नातं संपवत आहे. जर मोठा मुलगा जास्त त्रास देत असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा असंही महिलेने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.