चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:46 IST2025-07-08T10:45:51+5:302025-07-08T10:46:09+5:30
मलुहा एलासापूरची रेश्मा आणि कुशीनगरचा रहिवासी आरिफ यांच्यात टिकटॉकवरून बोलणे सुरु झाले. दोघांमध्ये हळहळू प्रेमसंबंध निर्माण होऊ लागले.

चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
बहराइचमध्ये एक विवाहबाह्य संबंधांचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. चार मुलांची आई असलेली महिला कोरोना काळात टिकटॉकवर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. त्याला तिने कुवेतला जाऊन भारतात आणले आणि पतीच्याच घरी राहू लागली. पतीला जेव्हा समजले तेव्हा तिने विष प्राशन केले. तिच्या मृत्यूनंतर कुवेतहून आलेल्या प्रियकराने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
बहराईचच्या मटेरा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका महिलेचे कुवेतला राहत असलेल्या भारतीय व्यक्तीशी सुत जुळले होते. मलुहा एलासापूरची रेश्मा आणि कुशीनगरचा रहिवासी आरिफ यांच्यात टिकटॉकवरून बोलणे सुरु झाले. दोघांमध्ये हळहळू प्रेमसंबंध निर्माण होऊ लागले. या काळात आरिफला कुवेतला नोकरी लागली आणि त्याने रेश्माला देखील बोलवून घेतले. मुलांना भारतातच ठेवून ती कुवेतला गेली, चांगली १० महिने तिथेच राहिली होती. १७ मे रोजी ती पुन्हा भारतात परतली होती.
रेश्माचा पती दिल्लीत नोकरी करत होता. तिथे त्याला भेटली आणि आरिफ हा आपला नातेवाईक असल्याचे त्याला सांगितले. त्याने विश्वास ठेवला. रेश्माने आरिफला आपल्या गावी सोडून या, असेही तिने पतीला सांगितले. यानुसार पती आरिफला बहराईचला सोडून पुन्हा दिल्लीत परतला. परंतू, जेव्हा आरिफ हा आपल्या पत्नीसोबत आपल्याच घरात राहत असल्याचे समजल्यावर पती गावी आला. रेश्माचे बिंग फुटताच लाजेखातर रेश्माने विष प्राशन केले, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे पाहून तिच्या बॉयफ्रेंड आरिफनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.