पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:16 IST2025-09-08T16:15:36+5:302025-09-08T16:16:05+5:30
एका महिलेचा नवरा कामासाठी सिल्वासाला गेला होता. यावेळी तो आपल्या पत्नीला देखील सोबत गेला. यादरम्यान, महिलेची तिथल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले.

पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत असतानाच आता गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. पती, पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात हाय वोल्टेज ड्रामा सुरू झाला. एका महिलेचा नवरा कामासाठी सिल्वासाला गेला होता. यावेळी तो आपल्या पत्नीला देखील सोबत गेला. यादरम्यान, महिलेची तिथल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले.
त्यानंतर ती महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत उत्तर प्रदेशातील हमीरपूरला आली आणि प्रियकराशी लग्न केले. मात्र, दुसरे लग्न करताच महिलेला आपल्या मुलांची आठवण आली आणि तिच्यातील आई जागी झाली. यानंतर, ती महिला तिच्या प्रियकराला सोडून तिच्या पतीसोबत घरी परतली.
पती, पत्नी आणि तोची ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरीला शहरात घडली आहे. या गावात राहणाऱ्या गुड्डी (३५) नावाच्या महिलेने शनिवारी शहरातील राम जानकी मंदिरात तिच्या प्रियकरासोबत लग्न केले. या लग्नाला शेकडो लोक उपस्थित होते. मात्र, महिलेच्या पतीला तिच्या लग्नाची माहिती मिळाली. त्यानंतर, तो रविवारी सकाळी आपल्या चार मुलांसह सरीला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.
२० वर्षांच्या संसाराला लागले ग्रहण!
पतीने सांगितले की, त्याचे २० वर्षांपूर्वी गुड्डीशी लग्न झाले होते. त्यांना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच अपत्ये आहेत. तो पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी सिल्व्हासा येथे गेला होता. त्याची पत्नी गुड्डीही तिथे काम करायची. सरीला नगरचा हरी हा त्यांच्या शेजारच्या खोलीत राहत होता. गुड्डीची हरीशी जवळीक झाली. १ सप्टेंबर रोजी ड्युटीवरून परतल्यावर मुलांनी त्याला सांगितले की, त्यांची आई घरी नाही.
मुलांना पाहून महिला झाली भावुक
थोडी शोधाशोध केल्यावर कळले की गुड्डी हरीसोबत हमीरपूरला गेली होती. तिने सरीला येथील राम जानकी मंदिरात हरीशी लग्न केल्याचेही पतीला कळले. त्यानंतर पतीने मोठ्या मुलीला मिर्झापूर येथे सोडून उर्वरित चार मुलांसह रविवारी सरीला पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी गुड्डीला स्टेशनला बोलावले. पोलीस स्टेशनमध्ये, महिलेने मुलांना पाहिले आणि ती भावूक झाली. यांनतर तिने प्रियकराला सोडून पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले.