मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:33 IST2025-06-13T11:28:03+5:302025-06-13T11:33:03+5:30
अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबाद विमान अपघातात काही सेकंदातच २४१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर एका इमारतीवर कोसळले या अपघातानंतर विमान प्रवाशांसह २६५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीला धडकल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विमान कोसळ्यानंतर आगीमुळे आजूबाजूचा परिसर भस्मसात झाला. त्यामुळे तिथल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान एआय-१७१ कोसळले. या अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. अहमदाबादच्या मेगाणीनगर भागात झालेल्या विमान अपघातानंतरचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला. पण या भयानक घटनेत एका आईच्या कृत्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंज देत होती.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जिथे विमान कोसळले तिथे एक आई तिच्या १५ वर्षांच्या मुलासह उपस्थित होती. जेव्हा अपघात झाला तेव्हा सीता पटणी नावाची महिला मुलासह आगीत उडकली. अपघातानंतर, आई अस्वस्थ अवस्थेत रस्त्यावर धावताना दिसत आहे. विमान कोसळताच, एक प्रचंड आगीचा भडका उडाला. त्यात सीता यांच्या १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
VIDEO | Ahmedabad Air Crash: Visuals show people running away moments after the Air India flight AI-171 crashed after taking off from the Ahmedabad airport.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
The Boeing aircraft, which could be seen losing altitude quickly, crashed in Meghaninagar area near the Ahmedabad… pic.twitter.com/oBOmc3rFDr
पण सीता पटानी शेवटपर्यंत त्यांच्या मुलाला आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. या प्रयत्नात तीही गंभीरपणे भाजली. याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्या मुलाला वाचवण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत आहे. त्यांच्या पाठीमागे विमान जळताना दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी १२ जून २०२५ रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ उड्डाणानंतर लगेचच मेघनीनगर परिसरात कोसळले. या अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला. पूर्णपणे इंधन भरलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अपघातानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.