जय महाराष्ट्र!; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील डॉक्टरच सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:37 AM2020-08-20T03:37:01+5:302020-08-20T09:42:09+5:30

देशभरातील १ कोटी ५८ लाख कोरोना योद्ध्यांपैकी सर्वाधिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत.

Most qualified doctors in the state of Maharashtra | जय महाराष्ट्र!; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील डॉक्टरच सर्वात पुढे

जय महाराष्ट्र!; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील डॉक्टरच सर्वात पुढे

Next

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी महाराष्ट्रात कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या पात्र असलेल्या डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. देशभरातील १ कोटी ५८ लाख कोरोना योद्ध्यांपैकी सर्वाधिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोरोना योद्धे असले तरी महाराष्ट्रात पात्र डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. देशभरात सेवा देणाºया एकूण ९ लाख २७ हजार एमबीबीएस डॉक्टरांपैकी महाराष्ट्रात १ लाख ४५ हजार डॉक्टर सेवा देत आहेत. महाराष्ट्रातील एकूण १५,०२, ६७२ कोरोना योद्ध्यांपैकी १,४५,८४८ एमबीबीएस डॉक्टर आहेत. याशिवाय ३१,७१७ दंतवैद्यक आणि १,५४,७८३ आयुष वैद्यक आणि १,६९,०० एमबीबीएस विद्यार्थी आहेत. याशिवाय ७२,८९५ आशा आणि १,९८,७८६ अंगणवाडी सेवकही कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी आहेत. येथे स्थापन केलेल्या ११ विशेषज्ञांच्या गटांपैकी मनुष्यबळ गटाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात सर्वाधिक १६.२४ लाख कोरोना योद्धे आहेत.
>बंगालमध्ये ११.१९ लाख
महाराष्टÑानंतर प. बंगालमध्ये ११.१९ लाख, तामिळनाडूत १०.९७ लाख, कर्नाटकात १०.१८ लाख, केरळमध्ये ८.६३ लाख, आंध्र प्रदेश ८.३६ लाख, राजस्थान ७.९३ लाख, गुजरात ६.४९ लाख, पंजाब ५.७१ लाख कोरोना योद्धे आहेत.
सर्वाधिक नर्स तामिळनाडू १.९१ लाख, केरळ १.८४ लाख, कर्नाटकात (१.६१ लाख) आहेत. कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाºया फार्मासिस्टची सर्वाधिक संख्या महाराष्टÑात (२.३३ लाख), प. बंगाल ०.९० लाख, उत्तर प्रदेश ०.८४ लाख आहे, तसेच सर्वाधिक डेन्टिस्ट कर्नाटकात ०.३४ लाख, महाराष्टÑ ०.३२ लाख, तामिळनाडूत ०.२० लाख कोरोना योद्धे म्हणून सेवा देत आहेत.
कोरोना योद्धा म्हणून एमबीबीएस डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी, डेन्टिस्ट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेहरू युवा केंद्र, एनएसएस, एनसीसी, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, पंचायत सचिव, ग्रामरोजगार सेवक, टपाल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Most qualified doctors in the state of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.