CAA : 'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:55 AM2020-01-28T09:55:50+5:302020-01-28T10:10:13+5:30

दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे.

Most of the people sitting in Shaheen Bagh are those who have come from Bangladesh and Pakistan says Rahul Sinha | CAA : 'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'

CAA : 'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'

Next
ठळक मुद्दे दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं. 'दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत'

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. 

भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं आहे. 'दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत' असं वादग्रस्त विधान सिन्हा यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. शाहीनबाग येथे सुरू असलेले आंदोलन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. सोमवारी (27 जानेवारी) एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

प्रसाद यांनी तुकडे तुकडे गँगच्या मदतीने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात शाहीनबागमध्ये लहान मुलांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच शाहीनबागमधील लोकांना त्रास होत असताना केजरीवाल शांत कसे बसतात असा सवालही त्यांनी केला आहे. 'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही हे आम्ही वारंवार सांगितले आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती ही सन्मानाने जगत होती आणि भविष्यातही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार कायम राहणार आहे. कायद्यातील ज्या कलमावर आक्षेप आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी पुढे येत नाही' असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त  

...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव

कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे

कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे

पक्षीय भेदांना थारा न देता संसदेत राज्याचे प्रश्न मांडा; सर्वपक्षीय खासदारांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

Web Title: Most of the people sitting in Shaheen Bagh are those who have come from Bangladesh and Pakistan says Rahul Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.