Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board  | अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

ठळक मुद्देअयोध्येत देण्यात आलेल्या जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या मशिदीचे नाव बाबराच्या नावाने नसेल.येथील सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. इस्लाममध्ये मशीद उभारण्यासाठी शिलान्यास कार्यक्रमाची परवानगी नाही.

लखनौ - अयोध्येत देण्यात आलेल्या जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या मशिदीचे नाव बाबराच्या नावाने नसेल. असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लाममध्ये मशीद उभारण्यासाठी शिलान्यास कार्यक्रमाची परवानगी नाही. केवळ पाया खोदूनच मशिदीच्या कामाला सुरुवात होते. मात्र, या जमिनीवर जेव्हा रुग्णालय अथवा ट्रस्टच्या इमारतीची पाया भरणी केली जाईल, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येईल.

इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यापूर्वी, मशिदीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी कुणी मला बोलावणार नाही आणि मीही जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने नुकतेच इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली आहे. ही संस्था अयोध्येत मशीद आणि त्याच्या भोवताली रुग्णालय, कम्युनिटी सेंटर आणि कम्युनिटी किचन तयार करणार आहे. तसेच तेथे इस्लामशी संबंधित एक रिसर्च सेंटरदेखील असेल.

महत्त्वाच्या बातम्या -

Coronavirus : आठ राज्यांतील 'या' 13 जिल्ह्यांत वेगानं पसरतोय कोरोना, मृत्यू दरही धडकी भरवणारा

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.