शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दहा वर्षांत 93 हजारांहून अधिक शाळा बंद; UP-MP आघाडीवर, महाराष्ट्रातील आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:16 IST

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

नवी दिल्ली: देशातील शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा वर्षांत देशभरातील 93 हजारांहून अधिक शाळा बंद झाल्या. ही माहिती दिली. राजस्थानमधील सीकरचे सीपीआय(एम) खासदार अमराराम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही आकडेवारी सादर केली. 

2014 ते 2020 दरम्यान सर्वाधिक शाळा बंद

सरकारी डेटानुसार, 2014-15 ते 2019-20 या सहा वर्षांत देशभरात तब्बल 70 हजारांहून अधिक शाळांवर टाळे लागले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. कोव्हिड काळात आणि त्यानंतरच्या वर्षांत म्हणजे 2020-21 ते 2024-25 या कालावधीतही सुमारे 18,700 पेक्षा जास्त शाळा बंद झाल्या. म्हणजेच वेग काहीसा कमी झाला असला, तरी शाळा बंद होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली नाही.

उत्तर प्रदेश आघाडीवर, मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशात सर्वाधिक सुमारे 24,600 शाळा बंद झाल्या आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशात जवळपास 22,400 शाळा बंद करण्यात आल्या. याशिवाय

ओडिशा- सुमारे 5,400 शाळा 

झारखंड - 5,000 हून अधिक शाळा

राजस्थान - 2,500 पेक्षा जास्त शाळा

बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठ्या राज्यांतही शाळांची संख्या घटली

महाराष्ट्र, बिहार, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांतही शेकडो ते हजारो शाळा बंद झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये एकूण शाळांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला असला तरी अखेरीस सुमारे एक हजार शाळा कमी झाल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्येही चिंताजनक स्थिती

अलीकडील काळात म्हणजे 2020-21 ते 2024-25 दरम्यान, मध्य प्रदेशात सुमारे 6,900 शाळा बंद झाल्या, तर जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 4,400 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही या कालावधीत एक हजारांहून अधिक शाळांवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातही शेकडो शाळा बंद झाल्याची नोंद आहे.

ग्रामीण आणि गरीब भागांतील शिक्षण धोक्यात

या आकडेवारीनंतर अनेक राज्यांतील शिक्षण धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांत याआधीही शाळा बंद करण्यावरून वाद झाले आहेत. राज्य सरकारे मात्र शाळा बंद झाल्याचे आकडे पूर्णतः मान्य करत नाहीत. मात्र शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी याला ‘शिक्षणविरोधी धोरण’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते, शाळा बंद झाल्यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबांतील मुलांसाठी शिक्षणाचा मार्ग अधिक कठीण होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Over 93,000 schools shut in India: UP, MP lead.

Web Summary : In the last decade, over 93,000 schools closed across India, with Uttar Pradesh and Madhya Pradesh reporting the highest numbers. Closures peaked between 2014 and 2020, impacting rural education significantly and raising concerns about access for disadvantaged children.
टॅग्स :SchoolशाळाParliamentसंसदBJPभाजपाlok sabhaलोकसभा