मध्य प्रदेशमध्ये स्कूलबस आणि बसचा भीषण अपघात, सात विद्यार्थी आणि बस ड्रायव्हरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 13:14 IST2018-11-22T13:14:07+5:302018-11-22T13:14:54+5:30
स्कूल बस आणि बसमध्ये समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात शालेय विद्यार्थी आणि एक ड्रायवर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमध्ये स्कूलबस आणि बसचा भीषण अपघात, सात विद्यार्थी आणि बस ड्रायव्हरचा मृत्यू
भोपाळ - मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात आज सकाळी स्कूल बस आणि बसमध्ये समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात शालेय विद्यार्थी आणि एक ड्रायवर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सतना जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी दूर असलेल्या बीरसिंहपूरजवळ झाला.
अपघाताबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षण संतोष सिंह गौर यांनी सांगितले की, बीरसिंहपूर येथे झालेल्या अपघातामध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे." पोलीस सूत्रांनी सांगितले की, आज सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहगितीनुसार स्कूलबसमधील विद्यार्थी हो लकी काँन्व्हेंट स्कूलमधील होते.
Seven children and bus driver was killed after a bus met with an accident in Satna,earlier today. #MadhyaPradeshpic.twitter.com/4xTyZJH74x
— ANI (@ANI) November 22, 2018
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल जैन, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. दरम्यान, अपघाताताबाबत सविस्त माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे.