सरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:17 IST2018-04-22T00:17:40+5:302018-04-22T00:17:40+5:30
भारतात मीडियाला दिला जातोय त्रास; अमेरिकेचा वार्षिक मानवाधिकार अहवाल

सरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले
वॉशिंग्टन : गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करणाºया प्रसार माध्यम संस्थांची कोंडी केली गेली आणि त्यांना त्रासही देण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशाससनाने केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्यावर्षीसाठी वार्षिक मानवाधिकार अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगातील जवळपास सर्वच देशांच्या मानवाधिकारासंबंधी स्थिती दर्शविलेली असते. या अहवालात म्हटले की, भारताच्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे परंतु त्यात माध्यम स्वातंत्र्याचा उल्लेख नाही. सरकार या अधिकारांचा आदर करत असली तरी काही अशा घटनाही घडल्या आहेत ज्यात टीका करणाºया माध्यम संस्थांवर कथितरित्या त्रास देण्यात आला आणि त्यांच्यावर दबावही टाकण्यात आला. इतर देशांच्या तुलनेत भारतात मानवाधिकाराची स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले असले तरी त्यात माध्यम स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे.
लंकेश हत्येचा उल्लेख
गेल्यावर्षी काही पत्रकारांना आणि प्रतिनिधींना बातम्या करताना हिंसेचा सामना करावा लागला आहे किंवा त्यांना त्रास देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अहवालात पत्रकार गौरी लंकेश आणि शांतनु भौमिक यांच्या हत्येचा उल्लेखही करण्यात आला आहे.