शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

'देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना नवीन 3 कृषी कायद्यांचा फायदा होईल'

By महेश गलांडे | Published: January 29, 2021 12:58 PM

राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासून केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात बोलताना हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्याच हिताचे असल्याचं सांगितलं.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासून केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात बोलताना हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्याच हिताचे असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे, तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाद कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात देशातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. तसेच, देशासाठी आणि जनतेसाठी सरकार कटिबद्ध असून जनहिताचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दिल्लीतीलआंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा ओझरता उल्लेख करत, शेती विधेयक हे देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणल्याचंही ते म्हणाले. तूर्तास, कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. माझं सरकार न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतं. ते न्यायालयाच्या आदेशांचं पालन करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासून केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात बोलताना हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्याच हिताचे असल्याचं सांगितलं. तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. जुन्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना मिळणारे अधिकार यापुढेही कायम राहतील, ही गोष्ट माझं सरकार स्पष्ट करू इच्छितं. जुन्या व्यवस्थेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या अधिकाऱ्यांना नख लावलं जाणार नाही. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या सुविधा मिळतील. त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढेल, असं राष्ट्रपती म्हणाले.

देशातील शेतकऱ्यांच्या एकूण संख्येपैकी 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्याकडे केवळ 2 ते 3 एकर जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे, सद्यस्थिती लक्षात घेऊन लहान शेतकऱ्यांचा प्राधान्य क्रमाने विचार करण्यात येत आहे. त्यातूनच, पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्या सरकारने 1,13,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिक पैसे ट्रान्सफर केले आहेत. तसेच, प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभही छोट्या-लहान शेतकऱ्यांना होत आहे. दरम्यान, ससंदेत गेल्या 7 महिन्यांपूर्वी महत्त्वाचे 3 कृषी कायदे संमत करण्यात आले. देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना या कृषी कायद्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊनच राजकीय पक्षांनी या विधेयकाचे समर्थन केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटलंय.  सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास या शेतकरी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलीय. त्यानुसार, माझं सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करेन. केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी विधेयकांमध्येही यापूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या सोयी-सुविधा, अधिकार होते ते कायम राहणार आहेत. त्यामध्ये कुठेच काही कमी येणार नाही. याउलट नवीन अधिकारांसह नव्या सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. शेतीला आणखी फायदेशीर बनविण्यासाठी आधुनिक कृषी इन्फास्ट्रक्चरवरही सरकार लक्ष देत आहे, त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या एग्रीकल्चर इन्फास्ट्रक्चर फंडाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, देशात सुरु करण्यात आलेली किसान रेल, शेतकऱ्यांच्या मालाला नवीन बाजार उपलब्ध करुन देण्यात नवा अध्याय लिहिला असून आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावल्या असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलंय. 

तिरंग्याचा अपमान दुर्दैवी

प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा झालेला अपमान दुर्दैवी आहे. घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच घटनेनं आपल्याला काही कर्तव्यंदेखील सांगितली आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याची शिकवण घटनेनं दिली आहे, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च काढला. यावेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकवला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी घटनेनं दिलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीagitationआंदोलन