सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:45 IST2025-10-15T09:45:11+5:302025-10-15T09:45:51+5:30
बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या रहिवासी असलेली भारती शुक्ला शिक्षिका आणि विमा एजंट होती. दिल्लीतील निगम बोध घाट येथे भारतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीची मैत्रीण रुबी कौर हिने दिलेल्या माहितीनुसार, भारती तिच्या घरी झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात भाजली होती. बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली.
भारतीने सकाळी चहा बनवण्यासाठी गॅस चालू केला. लाईटर लावताच मोठा स्फोट झाला. एसी चालू असल्याने संपूर्ण घर बंद होते. स्फोट इतका भयानक होता की सर्व खिडक्या आणि दरवाजे तुटून पडले. पण ती घाबरली नाही. शेजारी लगेच घटनास्थळी पोहोचले. भारतीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. बर्न रिपोर्टमध्ये भारतीचे शरीर ७०% जळाले होते.
दिल्लीतील एम्समध्ये रेफर करण्यात आलं. एम्समध्ये दाखल असताना, भारती दररोज नाचत असे आणि स्वतःचे व्हिडीओ रेकॉर्ड करत असे. डॉक्टरांनाही तिच्या या वागण्याचं आश्चर्य वाटायचं. अखेर ११ दिवसांनंतर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तिच्या मृत्यूच्या काही सेकंद आधी, भारतीने व्हेंटिलेटरवर असतानाही स्वतःचा नाचण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
भारतीने सांगितलं की, ती खूप आनंदी आहे कारण ती देवाच्या घरी जात आहे. ती अशा ठिकाणी जात आहे जे तिचं शेवटचं ठिकाण असेल. भारतीने सर्वांना शपथ घ्यायला लावली की, तिच्या मृत्यूनंतर कोणीही रडणार नाही किंवा शोक व्यक्त करणार नाही. त्याऐवजी, तिची अंत्ययात्रा बँडबाजासह निघेल. ढोल वाजवले जातील. सर्वजण नाचतील आणि तसंच घडलं.