शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

"आई, पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचं 18 व्यांदा लग्न झालं..."; माधवी लता यांनी सांगितली मन हादरवून टाकणारी घटना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 1:51 PM

Madhavi Latha : भरतनाट्यम डान्सर, सिंगर, कुशल वक्ता असण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत. लोक त्यांना 'लेडी सिंघम'ही म्हणतात. ओवेसींवर हल्ला चढवताना, हैदराबादमध्ये आज देखील काहीही बदललेले नाही. बिचारे मुस्लीमही तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू, असे माधवी म्हणतात.

भाजपने हैदराबादमध्ये माधवी लता (Madhavi Latha) यांना असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे माधवी लता सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. भरतनाट्यम डान्सर, सिंगर, कुशल वक्ता असण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत. लोक त्यांना 'लेडी सिंघम'ही म्हणतात. ओवेसींवर हल्ला चढवताना, हैदराबादमध्ये आज देखील काहीही बदललेले नाही. बिचारे मुस्लीमही तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू, असे माधवी म्हणतात. माधवी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यात, "15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मिडल ईस्टमधून एका मुलीने तिच्या आईला हैदराबादमध्ये फोन केला की, आई, जर पैसे असतील तर तुम्ही तेथे पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचे 18 व्यांदा लग्न झाले आहे." अशी अक्षरशः मन हेलावणारी घटना त्यांनी सांगितली. 

हैदराबादमध्ये मुली विकल्या जातात? -ओल्ड हैदराबादमध्ये माधवी लता असे का म्हणतात की, येथे मुली विकल्या जातात? यावर उत्तर देताना माधवी म्हणाल्या, "15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मिडल ईस्टमधून एका मुलीने तिच्या आईला हैदराबादमध्ये फोन केला की, आई, जर पैसे असतील तर तुम्ही तेथे पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचे 18 व्यांदा लग्न झाले आहे. हे सत्य आहे. अरबस्तानात 16 वर्षांच्या मुलीचे 70 वर्षांच्या माणसासोबत लग्न होते. मुलगी तर मुलगीच असते,  धर्म कुठून आला? मलाही दोन मुली आहेत. मी महिनांना ओळखते." एवढेच नाही, तर आपली मुलगी चांगल्या आणि प्रतिष्ठित घरात जावी, तिचे चांगल्या मुलाशी लग्न व्हावे, ती शिक्षित असावी आणि तिचा संसार चांगला व्हावा, असे प्रत्येक आईला वाटते, असे  माधवी म्हणाल्या.

...2-4 वेळा लग्न करतात -हैदराबादमध्ये पसमांदा मुस्लीम समाजाच्या अनेक गल्ल्या आहेत. त्यांचा आवाज चार भिंतीतून बाहेरही येत नाही. जे गरीबीमुळे 2-4 वेळा लग्न करतात. कारण यातून मिळणाऱ्या पैशांतून 7 ते 8 मुलांना भाकरी मिळते, असा दावा माधवी यांनी केला. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले.

मदरशांमध्ये अन्न पुरवतात माधवी -माधवी लता या हैदराबादमधील अनेक मदरशांना मोफत अन्न आणि औषधेही पुरवतात. रोजा सुरू असताना त्या कपडे, अन्न आणि रेफ्रिजरेटरचीही व्यवस्था करतात. मात्र याच वेळी त्यांनी असाही दावा केला आहे की, ते (मुस्लीम समाजातील लोक) म्हणतात, आई कुणाला सांगू नका, कारण त्यांना धमक्या मिळतात. एवढेच नाही तर, येथे आलात तर पाय तोडू, असे मौलाना साहेब माझ्या टीम मेंबर्सना म्हणतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माधवी लता यांचा अनेक मुस्लिम संघटना आणि ट्रस्टशी संबंध आहे. त्या मुस्लीम महिलांच्या संघटनांसोबत अनेक जनहिताची कामे करत आहेत. यामुळे, यावेळी ओवेसींचा दीड लाख मतांनी पराभव होईल, असा दावा त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, आयबीचा रिपोर्ट आल्यानंतर, सरकारने माधवी लता यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाElectionनिवडणूकTelanganaतेलंगणा