जोधपूरचा मोहित अन् ऑस्ट्रेलियाचा अँड्रयू, समलिंगी जोडप्याने जयपूरमध्ये केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:27 IST2024-09-14T15:24:17+5:302024-09-14T15:27:53+5:30
Gay Couple Ring Ceremony : जयपूरमधील डिग्गी पॅलेसमध्ये पार पडलेल्या साखरपुड्याची चर्चा होत आहे. मोहित आणि अँड्रयू या समलिंगी जोडप्याने आधी ऑस्ट्रेलियात कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर भारतात साखरपुडा केला.

जोधपूरचा मोहित अन् ऑस्ट्रेलियाचा अँड्रयू, समलिंगी जोडप्याने जयपूरमध्ये केला साखरपुडा
Jaipur News : जयपूरमध्ये झालेल्या एका साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एका समलिंगी जोडप्याचा डिग्गी पॅलेसमध्ये साखरपुडा झाला. दोघांचेही कुटुंबीय या कार्यक्रमाला हजर होते. दोघांनी ऑस्ट्रेलियात कोर्ट मॅरेज केल्यानंतर भारतात साखरपुडा करण्याचे ठरवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये असलेल्या डिग्गी पॅलेसमध्ये ज्या दोन समलिंगी व्यक्तींचा साखरपुडा झाला. त्यातील एक राजस्थानचा आहे. मोहित असे त्याचे नाव असून, तो मूळचा जोधपूरचा आहे. तर त्याच्या जोडीदाराचे नाव अँड्रयू असून, तो ऑस्ट्रेलियाचा आहे.
मोहित आणि अँड्रयूने आधी ऑस्ट्रेलियात कोर्ट मॅरेज केले होते. धार्मिक विधीनुसार लग्न करण्याचा त्यांचा विचार असून, त्यापूर्वी त्यांनी साखरपुडा केल्याची माहिती आहे.
मोहित आणि अँड्रयू यांचा साखरपुडा जयपूरमधील डिग्गी पॅलेस हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोघांचे कुटुंबीय हजर होते. सोशल मीडियावर या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.
डिग्गी पॅलेसचे मालक राम प्रताप सिंह यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, याबद्दल आम्हाला जास्त माहिती दिली गेली नव्हती. इथे साखरपुड्याचा कार्यक्रम झाला, पण आम्हाला सांगण्यात आले होते की, फक्त फोटोशूट आहे.