राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सद्यस्थितीसंदर्भात रविवारी मोठा इशारा दिला. मुंबईतील ‘संघाची १०० वर्षांची वाटचाल: नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेत बोलताना भागवत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठे विधान केले आहे.
भागवत म्हणाले, बांगलादेशात सुमारे १.२५ कोटी हिंदू आहेत. जर तेथील हिंदू आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी जागृत झाले, तर संपूर्ण जगातील हिंदू या लढ्यात त्यांच्या मदतीसाठी धावून येतील. त्यांना एकत्र यावे लागेल. ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्वासनानंतर, बांगलादेशातील वातावरण तणावपूर्णच आहे. त्यातच गेल्या डिसेंबर महिन्यात विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या हत्येनंतर तेथील परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अवैध स्थलांतरितांसंदर्भात कठोर भूमिका आवश्यक -भागवत पुढे म्हणाले, "नागरिकांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना ओळखावे आणि तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. एवढेच नाही तर, अशा लोकांना कोणीही कामावर ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेली केले.
एसआयआर (SIR) प्रक्रियेचा उल्लेख करत ते म्हणाले, "सरकारला अवैध स्थलांतर रोखण्यासाठी मोठी पावले उचलावी लागतील. अवैध लोकांची ओळख पटवून त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याची (डिपोर्ट) ही प्रक्रिया सध्या हळूहळू सुरू झाली आहे. भविष्यात ही मोहीम अधिक तीव्र होईल, असा विश्वासही त्यांनी यावेली व्यक्त केला.
"देश एकदाच तुटला, जेव्हा..." -तत्पूर्वी शनिवारच्या सत्रात बोलताना भागवत म्हणाले होते, "आपल्या देशात इस्लामच्या आक्रमानाबरोबर मुस्लीम आले. अद्यापपर्यंत आहेत. त्यांचा इस्लाम गेला नाही. आपल्या बोरोबर आहेत. ख्रिश्चन आले. त्यांची ख्रिश्चनिटी कायम आहे. आपसात खूट-खूट होत राहते. मात्र, देश तुटला असे कधी झाले नाही. एकदाच तुटला, जेव्हा ‘हिंदू भावाचे विस्मरण झाले".
हिंदुत्व सुरक्षिततेची हमी देते -भागवत म्हणाले, "हिंदू असण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने त्यांचा धर्म पाळणे थांबवावे. हिंदुत्व स्वीकारल्याने तुम्ही काहीही गमावत नाही, तुमच्या धार्मिक पद्धती किंवा तुमची भाषाही गमावत नाही. हिंदुत्व तुमच्या सुरक्षिततेची हमी देते. भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता.
भागवत पुढे म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्य हा चुकीचा वाक्यांश आहे कारण तुम्ही दोन (वेगळ्या) लोकांना एकत्र करत आहात, जे आधीच एक आहेत त्यांना नाही. ते म्हणाले की आरएसएस समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि संघटनेचे स्वरूप धारणा आणि प्रचाराच्या आधारे समजले जाऊ शकत नाही.
Web Summary : Mohan Bhagwat raised concerns about the safety of Hindus in Bangladesh, urging them to fight for rights with global Hindu support. He stressed identifying illegal immigrants, advocating strict action and deportation, highlighting the need for societal unity beyond religious differences.
Web Summary : मोहन भागवत ने बांग्लादेश में हिंदुओं की सुरक्षा पर चिंता जताई, उनसे वैश्विक हिंदू समर्थन के साथ अधिकारों के लिए लड़ने का आग्रह किया। उन्होंने अवैध आप्रवासियों की पहचान करने, सख्त कार्रवाई और निर्वासन की वकालत करते हुए धार्मिक मतभेदों से परे सामाजिक एकता की आवश्यकता पर जोर दिया।