मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:22 IST2025-01-15T17:22:10+5:302025-01-15T17:22:38+5:30
BJP VS Congress: राहुल गांधींनी मोहन भागवतांचे संविधानावरील वक्तव्य देशद्रोह असल्याचे म्हटले आहे.

मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...
Rahul Gandhi on Mohan Bhagwat: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्याला देशद्रोह ठरवत राहुल गांधी म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे भागवतांचे विधान संविधानाविरोधात आहे. हे भारतीय जनतेचा घोर अपमान आहे. हे विधान म्हणजे देशद्रोह आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
निर्मला सीतारामन यांचे जोरदार प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जे नेते लोकसभेत बसून राज्यघटनेनुसार शपथ घेतात, तेच नेते आता भारताच्या विरोधात वक्तव्ये करू लागले, तर ही चिंताजनक बाब आहे. राहुल गांधींचे वक्तव्य फेटाळून लावत त्या म्हणतात, हे विधान देशाच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे. राहुल गांधी हे भारताचे विरोधी पक्षनेते आहेत आणि अशी विधाने करणे हे केवळ त्यांच्या पदाच्या विरोधात नाही, तर भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न आहे.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया काय म्हणाले
दिल्ली भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राहुल गांधींनी भारताच्या अखंडतेची शपथ घेतली होती आणि आता ते त्याच भारताशी लढण्याची भाषा करत आहेत. हे देशद्रोहाचे वक्तव्य आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत भाटिया म्हणाले की, ते देशाच्या विरोधात असलेल्या लोकांसोबत स्टेज शेअर करतात. राहुल गांधींचे हे विधान अवैध असून, ते आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
जेपी नड्डाांचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. नड्डा म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास नेहमीच अशा शक्तींना पाठिंबा देण्याचा राहिला आहे, ज्यांना भारत कमकुवत पहायचा आहे. राहुल गांधींच्या सत्तेच्या लालसेने त्यांना देशाच्या अखंडतेविरुद्ध बोलण्यास भाग पाडले आहे. भारतीय जनता पक्ष सदैव भारताच्या एकता आणि अखंडतेच्या बाजूने उभा राहील आणि काँग्रेसची ही विचारधारा कधीही मान्य केली जाणार नाही.