शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

ममतांच्या ‘खेला होबे’ला  मोदींकडून ‘विकास होबे’ उत्तर, पुरुलियात भाजपसाठी पहिली प्रचारसभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 4:15 AM

दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली.

पुरूलिया (प. बंगाल) :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारील त्यांच्या पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले. (Modi's 'Vikas Hobe' reply to Mamata's 'Khela Hobe', first campaign rally for BJP in Purulia) दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत तृणमूल हाफ झाली, आता साफ होईल, अशीही तोफ डागली.  प. बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पुरूलियात मोदींनी गुरूवारी सकाळी घेतली आणि दुपारी आसाममध्ये करीमगंज येथे सभा घेतली.

शिशिर अधिकारी अमित शहांना भेटणार- भाजपवासी झालेले शुभेन्दू अधिकारी यांचे वडील तृणमूलचे एक संस्थापक व  खासदार शिशिर कुमार अधिकारी हेही भाजपच्या वाटेवर आहेत. - ते २१ मार्चला गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतील, असे शुभेन्दू अधिकारी यांनी सांगितले. मोदी यांची नंदीग्राम येथे २० तारखेला सभा होणार आहेत. त्यावेळीही ते  हजर राहू शकतील. 

ट्रान्स्फर माय कमिशन केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानElectionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगाल