मोदी यांची आज कोलकात्यात सभा, गांगुली, मिथुन चक्रवर्ती व्यासपीठावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:30 IST2021-03-07T06:29:40+5:302021-03-07T06:30:06+5:30

गांगुलीने आपल्या पक्षात यावे, यासाठी मध्यंतरी भाजप व तृणमूल काँग्रेसतर्फे प्रयत्न सुरू होते. याच काळात त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Modi's meeting in Kolkata today, Ganguly, Mithun Chakraborty on stage? | मोदी यांची आज कोलकात्यात सभा, गांगुली, मिथुन चक्रवर्ती व्यासपीठावर?

मोदी यांची आज कोलकात्यात सभा, गांगुली, मिथुन चक्रवर्ती व्यासपीठावर?

ठळक मुद्देगांगुलीने आपल्या पक्षात यावे, यासाठी मध्यंतरी भाजप व तृणमूल काँग्रेसतर्फे प्रयत्न सुरू होते. याच काळात त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोलकाता : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर सभा होणार असून, त्या सभेत सौरव गांगुली व मिथुन चक्रवर्ती यांच्यासह काही नामवंत मंडळी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा जोरात सुरू आहे.

गांगुलीने आपल्या पक्षात यावे, यासाठी मध्यंतरी भाजप व तृणमूल काँग्रेसतर्फे प्रयत्न सुरू होते. याच काळात त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या दबावामुळे त्यांना त्रास झाल्याचेही बोलले जात होते. स्वत: गांगुली याने मात्र सर्वांना सर्व काही जमतेच असे नाही, असे म्हणून राजकारण आपला प्रांत नसल्याचे अलीकडेच सूचित केले आहे. दरम्यान, राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी यांनी शनिवारी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला

गांगुली, मिथुन चक्रवर्ती व्यासपीठावर दिसणार?

Web Title: Modi's meeting in Kolkata today, Ganguly, Mithun Chakraborty on stage?