मोदीजी वाटेल ती आश्वासनं देतात, विसरुनही जातात- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:55 IST2018-02-16T15:34:10+5:302018-02-16T15:55:36+5:30

त्रिपुरा येथे 18 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

Modiji offers assurances and forgets- Rahul Gandhi | मोदीजी वाटेल ती आश्वासनं देतात, विसरुनही जातात- राहुल गांधी

मोदीजी वाटेल ती आश्वासनं देतात, विसरुनही जातात- राहुल गांधी

आगरतळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वाटेल ती आश्वासनं देतात आणि ती सोयीस्करपणे विसरुनही जातात, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते शुक्रवारी त्रिपुरा येथील जाहीर सभेत बोलत होते. 

यावेळी राहुल यांनी म्हटले की, मोदीजी अनेक ठिकाणी जात असतात, त्याठिकाणी 2-3 आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर सोयीस्करपणे विसरुनही जातात. ते जिथे जातील तिथे अवास्तव आश्वासनं देतात, असे राहुल यांनी म्हटले. आता भाजपाचे नेते राहुल यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

त्रिपुरा येथे 18 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आज याठिकाणी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 3 मार्चला जाहीर होणार आहे. काँग्रेसने ५६ जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा त्रिपुराचा दौरा केला. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले होते.


Web Title: Modiji offers assurances and forgets- Rahul Gandhi