शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

मोदी स्वतःच स्वतःच्या पराभवाचा पाया रचताहेत; अरुण शौरींनी 'असं' मांडलं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 6:01 PM

ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची कार्यपद्धती पाहता 2019 पर्यंत ते स्वत:च्या पराभवासाठी जमीन तयार करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील, असा खोचक टोला भाजपाचे ज्येष्ठ अरूण शौरी यांनी लगावला. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, मोदी सध्या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला वेचून संपवेन, अशी भावना ते विरोधकांच्या मनात तयार करत आहेत. तुम्ही सर्वजण एकत्र आला नाही तर तुम्हाला आमच्यापासून धोका राहील, असा संदेशच त्यांनी आपल्या कृतीमधून विरोधकांना दिला आहे. त्यांच्या याच वृत्तीमुळे अनेक ठिकाणी नवे नेतृत्त्व उदयाला आले आहे. गुजरातमध्ये पाहिल्यास याचे प्रत्यंतर येऊ शकते. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हे नेते शुन्यातून उदयाला आले आहेत. ही मोदींच्या आक्रमक राजकारणाची निर्मिती आहे, असे शौरी यांनी म्हटले. तसेच शौरी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांकडे आश्वासक चेहरा नसल्याचा आक्षेपही खोडून काढला. या मुद्द्याचा नको इतका बागुलबुवा करण्यात आला आहे. १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची संपूर्ण देशात लाट असताना तेव्हा त्यांना हरवण्यासाठी कोणताच चेहरा नव्हता. लोकांनीच त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी चेहऱ्याची गरज नाही, असे शौरी यांनी सांगितले. याशिवाय, २०१९ साठी भाजपच्या विरोधात आताच महाआघाडी स्थापन करणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. परंतु, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे पतन होईल, असे केवळ विरोधकांनाच वाटत नाही, तर भाजपच्या घटक पक्षांनाही वाटत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Arun Shourieअरुण शौरीNarendra Modiनरेंद्र मोदी