प्रेरणादायी महिलांना मोदी देणार स्वत:ची सोशल मीडिया अकाऊंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:38 IST2020-03-04T04:12:02+5:302020-03-04T07:38:53+5:30
जनतेने प्रेरणादायी महिलांच्या कथा मला कळवाव्यात, असे आवाहनही मोदी यांनी केले.

प्रेरणादायी महिलांना मोदी देणार स्वत:ची सोशल मीडिया अकाऊंट्स
नवी दिल्ली : आम्हाला जीवन आणि कार्यातून प्रेरणा देणाऱ्या महिलांकडे मी माझी सोशल मीडिया अकाऊंटस् सोपवून देईन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. जनतेने अशा प्रेरणादायी महिलांच्या कथा मला कळवाव्यात, असे आवाहनही मोदी यांनी केले.
‘या महिलादिनी मी माझी सोशल मीडिया अकाऊंटस् अशा महिलांकडे सोपवून देईन ज्यांचे जीवन आणि कार्य यातून आम्हाला प्रेरणा मिळते. यामुळे दशलक्षावधी लोकांना काही तरी नवीन करण्यास मदत होईल. असे कार्य करणाºया तुम्ही एक महिला आहात का? किंवा प्रेरणादायी कार्य करणाºया महिलांची माहिती तुम्हाला आहे? तसे असेल तर त्यांचे कार्य, कथा हॅशटॅगशीइन्स्पायरअस’चा वापर करून मला कळवा, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. मी सोशल मीडिया अकाऊंटस् सोडून देण्याचा विचार करीत असल्याचे मोदी यांनी सोमवारी म्हटल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांना यामुळे पूर्णवराम मिळाला आहे.
मोदी यांनी ‘या रविवारी मी फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबरील माझी सोशल मीडिया अकाऊंटस् सोडून देण्याचा विचार करीत असल्याची पोस्ट टाकल्यावर चर्चांना सुरुवात झाली होती. त्यांची ही पोस्ट येताच अवघ्या अर्ध्या तासात २६ हजारांपेक्षा जास्त वेळा ती री-ट्विटही झाली होती.
>‘लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न’
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मोदी यांना सोशल मीडिया अकाऊंटस्चा त्याग करण्याची केलेली सोमवारची घोषणा म्हणजे त्यांच्या सरकारच्या अपयशावरील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, असे मंगळवारी हिंदी भाषेत केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले.