शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
2
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
3
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
4
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
5
Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य
6
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
7
'त्रिदेव' फेम अभिनेत्री सोनम खान तीन दशकानंतर करतेय कमबॅक, या कारणामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री
8
Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीत आधी घसरण, मग किरकोळ तेजी; एशियन पेट्स वधारला, PSU शेअर्समध्ये तेजी
9
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
10
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
11
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
12
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
13
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
14
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
15
मान्सूनसरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र
16
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
17
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
18
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
19
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
20
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक

मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 3:13 PM

सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

अयोध्या - सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगभर फिरतात. अनेकांच्या गळाभेटी घेतात. पण आपल्याच लोकांना भेटणे मात्र टाळतात, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.अमेठी आणि रायबरेली या गांधी कुटुंबीयांच्या पारंपरिक मतदारसंघांच्या दौरा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आज अयोध्येला भेट दिली. यावेळी प्रियंका गांधी यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला. त्या म्हणल्या, आज या देशात जनतेचे दु:ख ऐकण्यासाठी कुणीही नाही. देशातील तरुण बेरोजगार होऊन फिरत आहेत. सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकार एवढे दुबळे सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही.''  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली. ''वाराणसीच्या गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात का असे जेव्हा मी स्थानिकांका विचारले तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिले. हे ऐकून मला धक्का बसला. मला वाटले होते यांनी काही तरी केले असेल. पण हे पूर्ण जग फिरतात. अनेकांची गळाभेट घेतात. मात्र आपल्याच लोकांनी त्यांनी भेट घेतलेली नाही."

 भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. ''भाजपा सरकार खोटेपणा आणि प्रचारावर उभे आहे. तिथे जनतेचे दु:ख ऐकणारा कुणी नाही. देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्यांना मनरेगाचे पैसे सहा सहा महिन्यांपर्यंत मिळत नाही. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. कारण मनरेगाला बंद करण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भाजपाच्या राज्यात जनतेचा आवाज दाबला जात आहे.'' असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी