चक्रीवादळामुळे थांबला मोदी, शहा, ममतांचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 03:29 IST2019-05-04T03:28:18+5:302019-05-04T03:29:23+5:30

फनी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या सर्वप्रचारसभा शुक्रवारी रद्द केल्या

Modi, Shah, Mamata's campaign rally canceled due to hurricane | चक्रीवादळामुळे थांबला मोदी, शहा, ममतांचा प्रचार

चक्रीवादळामुळे थांबला मोदी, शहा, ममतांचा प्रचार

नवी दिल्ली : फनी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या सर्वप्रचारसभा शुक्रवारी रद्द केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काही मोजक्या सभानंतर चक्रीवादळामुळे पुढचे सर्व कार्यक्रम रद्द केले. ओडिशाच्या पुरी किनाऱ्यापर्यंत पोहचलेले चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने जाण्याची शक्यतेमुळे ममता बॅनर्जी यांनी ४८ तासांतील सर्व सभा रद्द केल्याचे जाहीर केले.

समुद्र किनाऱ्यापाशी राहणाऱ्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. त्या राज्यात
चक्रीवादळामुळे निर्माण होणारी स्थिती तसेच मदत व पुनर्वसन यांवर लक्ष ठेवून आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही
संबंधितांची बैठक घेऊ न त्यांना सूचना दिल्या. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या शुक्रवारी झारखंडमध्ये प्रचारसभा होणार होत्या. पण वादळाचा तडाखा झारखंडच्या काही भागालाही बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी तेथील आपल्या सभा रद्द करीत असल्याचे संबंधित नेत्यांना कळवले. त्यांच्या तीन सभा होणार होत्या.

Web Title: Modi, Shah, Mamata's campaign rally canceled due to hurricane