शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

"मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान"; अर्थमंत्री संतापल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 2:24 PM

Nirmala Sitharaman And Rahul Gandhi : अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. याच दरम्यान सीतारामन यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, असंही निर्मला सीतारामन यांनी  म्हटलं आहे. 

राहुल गांधींच्या 'हम दो, हमारे दो' या संसदेतील वाक्यावरही अर्थमंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे. 'हम दो, हमारे दो' तुमच्याकडेच आहे. दोन लोक पक्ष सांभाळणार आणि दोन पक्षातील बाहेरचं सगळं. तसेच एका पक्षाच्या सरकारमध्ये 'जावयाला' अनेक राज्यांत (राजस्थान, हरयाणा) जमिनी मिळाल्या. मी याची अधिक माहिती तुम्हाला देऊ शकते. 'हम दो, हमारे दो' मध्ये जावयाची जमीन परत करण्याचीही घोषणा केली असती तर बरं झालं असतं. मात्र असं काहीही घडलेलं नाही. आमचा पक्ष असं करत नाही. पंतप्रधान स्वनिधी योजना याचा ट्रेलर आहे. या योजनेद्वारे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची मदत करण्यात आली असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसने अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी मुद्यावर यू-टर्न घेतला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की पंजाब सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल. तीन कायद्यांतील काही त्रुटी निदर्शनास आणून देतील. दाखवून देतील की हे कायदे नेमके कसे शेतकरीविरोधी आहेत. असं काहीही घडलं नाही असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. "मुद्रा योजनेअंतर्गत 27 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली. ही कर्ज कोणी घेतली जावयानं का?," असं म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारतManmohan Singhमनमोहन सिंगnirmala sitharamanनिर्मला सीतारामन