मोदी-ओबामांचे चले साथ साथ

By Admin | Updated: October 1, 2014 03:18 IST2014-10-01T03:18:42+5:302014-10-01T03:18:42+5:30

नागरी अणुकरार आणि दहशतवादाला मोडून काढण्यात होत असलेले अडथळे दूर करण्यासाठी द्विपक्षीय नाते नव्या पातळीवर नेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधिलकी व्यक्त केली.

Modi-Obama's walk together | मोदी-ओबामांचे चले साथ साथ

मोदी-ओबामांचे चले साथ साथ

>द्विपक्षीय नाते नव्या पातळीवर नेणार : भेटीत केली व्यापार, गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रवर चर्चा
वॉशिंग्टन : नागरी अणुकरार आणि दहशतवादाला मोडून काढण्यात होत असलेले अडथळे दूर करण्यासाठी द्विपक्षीय नाते नव्या पातळीवर नेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधिलकी व्यक्त केली.
मोदी व ओबामा यांच्यात मंगळवारी तासभर चर्चा झाली. आर्थिक सहकार्य, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रतील सहकार्य आदी मुद्दे प्रामुख्याने होते. मोदी यांनी अमेरिकेत भारतीय सेवांना सहजपणो प्रवेश मिळावा अशी मागणी केली. भारत व अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रत 1क् वर्षे सहकार्य करण्याचा करार झाल्यानंतर मोदी यांनी भारतीय संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या कंपन्यांना निमंत्रण दिले. चर्चेत दक्षिण आशियातील दहशतवाद व पश्चिम आशियात निर्माण होत असलेले धोके यांच्यावरही चर्चा झाली. (वृत्तसंस्था)
 
संयुक्त पत्रकार परिषदेतील मुद्दे 
द्विपक्षीय संबंध 
मोदी यांनी भारत-अमेरिकेचे संबंध झपाटय़ाने प्रगती करतील, अशी आशा व्यक्त केली. 
 
नागरी अणूकरार
नागरी अणु भागीदारी करार होण्यासाठी आम्ही दोघेही बांधील आहोत. नागरी अणु ऊर्जा क्षेत्रतील सहकार्याशी संबंधित अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचेही गांभीर्य आम्हाला आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षाविषयक गरजा भागणो हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. 
 
विकास 
दोन्ही देशांत व्यापार, आर्थिक सहकार्य, अंतराळ व वैज्ञानिक विकासासाठी विशेषत: इबोलाच्या आव्हानाला तोंड देण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे ओबामंनी सांगितले.
 
सेवा क्षेत्र : अमेरिकेतील बाजारपेठेत सेवा क्षेत्रत भारतीय कंपन्यांना सहज प्रवेश मिळण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती मोदी यांनी ओबामा यांना केली. 
संरक्षण : सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रत संवाद वाढविण्यास दोन्ही देशांनी पुढे पावले टाकण्याचे ठरविल्याचे मोदी म्हणाले. भारताने नुकतीच संरक्षण क्षेत्रत परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 वरून 49 टक्क्यांर्पयत वाढविली. भारत हा आशियात शांतता व सुरक्षेसाठी महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे येत असल्याचे बराक ओबामा म्हणाले.
 
दहशतवाद्यांना उखडून काढू
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद, डी कंपनी, अल-कायदा व हक्कानी यासारख्या दहशतवादी संघटनांना उखडून काढण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर मोदी आणि ओबामा यांच्यात सहमती झाली. यासंदर्भातील भारत-अमेरिका सहकार्य आणखी वृद्धिंगत करतील तसेच या दहशतवादी संघटनांना मिळणारे आर्थिक आणि डावपेचात्मक पाठबळ रोखण्यासाठी पाऊले उचलण्यालाही उभय नेत्यांनी मान्यता दिली.
 
आता भारतात या.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे व्हाइट हाउसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनीही दहशतवादाविरोधात एकत्र लढण्यासाठी हात मिळवले.  मोदी यांनी ओबामा यांना कुटुंबियांसह भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
 

Web Title: Modi-Obama's walk together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.