शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी घेतली 'गब्बर सिंग'ची मदत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 16:26 IST

गुजरातमधील प्रचारसभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी काही ठराविक उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी 'गब्बर सिंग'ची मदत केल्याचा आरोप केला आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस वारंवार जीएसटीवरुन भाजपा सरकारवर निशाणा साधत आहे. गुजरातमधील प्रचारसभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी काही ठराविक उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी 'गब्बर सिंग'ची मदत केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 'गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकणार असून, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. वादळ येत आहे', असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

'आम्हाला एकच जीसएटी हवा आहे. गब्बर सिंह टॅक्स नको', असं पुन्हा एकदा राहुल गांधींनी यावेळी बोलताना सांगितलं. राहुल गांधींनी आरोप केला की, 'मोदींनी आपल्या पाच ते दहा मित्रांना 55 हजार कोटी रुपये दिले आहेत'. गुजरातमध्ये एका आईला आपल्या मुलाला इंजिनिअर बनवण्यासाठीही लाच द्यावी लागते असा आरोप राहुल गांधींनी केला.  

राहुल गांधींनी यावेळी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास 10 दिवसांत कर्जमाफी करण्याची योजना आखली जाईल असं आश्वासन दिलं. शेतक-यांच्या मुद्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपावर टीका करताना म्हटलं की, 'शेतक-यांची परिस्थिती वाईट आहे आणि मोदींनी 10 उद्योजकांचं 1 लाख 30 हजार कोटींचं कर्ज माफ केलं आहे'.

गुजरातच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बोलले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि पाकिस्तानबद्दल बोलत असतात, पण गुजरातबद्दल नाही'. 'भाजपाने अद्याप आपला घोषणापत्र जाहीर केलेलं नाही. तुमच्यासाठी त्यांना काय करायचं आहे हे अद्याप सांगू शकलेले नाहीत', असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी यावेळी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. 'काँग्रेस पक्ष पंतप्रधान पदाचा आदर करतो. काँग्रेस पक्षात कोणीही असभ्य भाषा वापरत पंतप्रधानांवर टीका करु शकत नाही. मोदीजी आपल्याबद्दल काहीही बोलू शकतात. म्हणून मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे', असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना 'नीच' असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई होण्याआधी मणिशंकर अय्यर यांनी माफी मागत आपली हिंदी खराब असून, कोणाला त्याच्यावर आक्षेप असेल तर माफी मागतो असं म्हटलं होतं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी