शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत : डॉ. मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:30 IST

अनेक प्रश्नांवर मौन बाळगल्याबद्दल टीकेची झोड

नवी दिल्ली : अतिशय संयमी नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोडच उठवली. मतदारांनी मोदी यांच्यावर खूप विश्वास टाकून, त्यांच्या पक्षाला भरभरून मते दिली; पण मोदी मात्र जनतेच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत, असे उद्गार त्यांनी काढले.पंतप्रधान मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वेगाने कमी होत चालला आहे, असे सांगून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान हा पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा असतो; पण मोदी यांच्या काळात सीबीआयसारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेची विश्वासार्हता कमी झाली, ही वस्तुस्थिती आहे. जातीय व धार्मिक हिंसाचार, जमावाकडून विशिष्ट लोकांवर होणारे हल्ले, गोरक्षकांकडून होणारी मारहाण या सर्व विषयांवर मोदी यांनी मौनच बाळगले. एवढेच नव्हे, तर त्यांच्याच काळात अनेक विद्यापीठांमधील वातावरणही बिघडले आणि कलुषित झाले, हे सर्वज्ञात आहे. काँग्रेसचे खा. शशी थरूर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. २0१४ साली खोटी आश्वासने दिली आणि सत्ता मिळवली; पण चार वर्षांत त्यांनी जनतेचा विश्वासघातच केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.प्रशासनावर नियंत्रण नाही : शौरीया समारंभास माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच अरुण शौरी हेही उपस्थित होते. आपली फसवणूक झाल्याची जाणीव आता जनतेला व्हायला लागली आहे. मोदी यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसल्याचे सीबीआय प्रकरणावरून स्पष्टच झाले आहे, अशी टीका अरुण शौरी यांनीही केली.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस