शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या जन धनसारख्या 'या' पाच मोठ्या योजनांनी गरिबांना दिला आधार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 10:01 IST

योजनांमुळे देशातील शेवटच्या रांगेत असलेल्या गरिबांच्या जीवनात मोठे बदल झाले

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी गरिबांना आधार दिला आहे. ५ किलो तांदूळ मोफत देण्यासारखा चांगला निर्णय मोदी सरकारनं घेतला. तसेच मोदी सरकारनं गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या, त्या योजनांमुळे कोरोनाच्या संकटातही गरिबांना आधार मिळाला आहे. जनधन योजनेपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणातही मोदी सरकारनं आमूलाग्र बदल केले आहेत. आता नरेंद्र मोदींच्या 5 मोठ्या योजनांबद्दल माहिती जाणून घेऊयात. या योजनांमुळे देशातील शेवटच्या रांगेत असलेल्या गरिबांच्या जीवनात मोठे बदल झाले आणि या सर्व योजना अशा होत्या, ज्यात पंतप्रधानांचा वरचष्मा दिसून येत होता.उज्ज्वला योजनाकेंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेने दुर्बल घटकातील कुटुंबांना, विशेषत: महिलांना खूप दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे 1 मे 2016ला ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएमयूवाय अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरगुती एलपीजी (LPG) कनेक्शन देण्यात आले.प्रधानमंत्री जन धन योजनापंतप्रधान जन धन योजना मोदी सरकारची गेमचेंजर योजना म्हणूनही पाहिली जाते. ही योजना 28 ऑगस्ट 2014ला सुरू केली गेली. या योजनेंतर्गत देशातील गरीब लोकांची पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक खाती उघडली गेली. ही खाती आधार कार्डशी जोडली गेली. त्याचा फायदा म्हणजे केंद्राच्या योजनांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात पाठविले जात आहे, तसेच या योजनेंतर्गत लोकांना एक लाख रुपयांचा अपघात विमा योजनेची सुविधादेखील पुरविली गेली.आयुष्मान भारत योजनादेशातील गरीब नागरिकांना चांगले आरोग्य सेवा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना आणली. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा प्रदान करते आणि त्यांना त्याचा मोबदला देते, जेणेकरून त्यांना रुग्णालयात गंभीर आजारावर मोफत उपचार मिळतील. या योजनेंतर्गत शासकीय संचालित विविध सरकारी रुग्णालये समाविष्ट करण्यात आली असून, 1350 सूचीबद्ध आजारांवर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी)या योजनेचे उद्दिष्ट हे सर्व निम्न वर्ग, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय लोकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. वर्ष 2022पर्यंत सर्व लाभार्थी योजनेंतर्गत येतील. ही योजना ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) म्हणून ओळखली जाते.राष्ट्रीय शिक्षण धोरणदेशाचे शिक्षण धोरण कालबाह्य झाले होते, अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणात मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी नवीन शिक्षण धोरण आणले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत