दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:33 IST2025-10-11T16:33:00+5:302025-10-11T16:33:51+5:30
पीएम मोदींनी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कृषी क्षेत्रासाठी दोन मोठ्या योजना सुरू केल्या. या योजनांचा एकूण खर्च ₹35,440 कोटी असून, त्यांचा उद्देश भारताला दाळ उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे आणि कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांचे पुनरुत्थान करणे हा आहे. याशिवाय, कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले.
मिळालेल्या माहितीनुसार, 'डाळ स्वावलंबन अभियान' साठी 11,440 कोटी रुपये खर्च येईल आणि 2030-31 पर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 25.238 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवून देशाचे आयात अवलंबित्व कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
"Will transform fortunes of farmers": PM Modi launches Rs 35,440-crore farm schemes, criticises previous govt for "lack of vision"
— ANI Digital (@ani_digital) October 11, 2025
Read @ANI Story |https://t.co/xYCp93winQ#PMModi#FarmSchemes#farmerspic.twitter.com/rft9QtGqqK
याव्यतिरिक्त, 24 हजार कोटी रुपयांच्या 'प्रधानमंत्री धान्य कृषी योजने'चे उद्दिष्ट 100 कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांचे रुपांतर करणे आहे. ही योजना उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, सिंचन आणि साठवणूक सुधारणे आणि निवडक 100 जिल्ह्यांमध्ये कर्जाची सहज उपलब्धता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करेल. दोन्ही योजनांना आधीच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, येत्या रब्बी हंगामापासून 2030-31 पर्यंत चालेल.
कृषी क्षेत्रातील इतर प्रकल्पांचे उद्घाटन
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ₹5,450 कोटींच्या विविध कृषी, पशुपालन, मत्स्य आणि अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यात- बंगळुरू आणि जम्मू-कश्मीरमध्ये कृत्रिम गर्भाधान प्रशिक्षण केंद्र, अमरेली आणि बनास येथे उत्कृष्टता केंद्र, असममध्ये राष्ट्रीय गोकुल मिशनअंतर्गत आयव्हीएफ प्रयोगशाळा, मेहसाणा, इंदूर आणि भीलवाडा येथे दूध पावडर संयंत्र आणि तेजपूर येथे मत्स्य संपदा योजनेअंतर्गत फिश फीड प्लांटचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ₹815 कोटींच्या नव्या प्रकल्पांची भूमिपूजनही करण्यात आले.