PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना मोदी सरकार दरवर्षी देणार ३६ हजार रुपये, केवळ करावं लागेल एवढं काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:43 IST2022-03-09T17:41:19+5:302022-03-09T17:43:25+5:30
PM Kisan Mandhan Yojana Update: केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात.

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना मोदी सरकार दरवर्षी देणार ३६ हजार रुपये, केवळ करावं लागेल एवढं काम
नवी दिल्ली - भारत एक कृषिप्रधान देश आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. दरवर्षी शेतकरी आर्थिक नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असतात. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान, ही रक्कम पेन्शनच्या रूपामध्ये सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात.
पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना अगदी माफक रक्कम दरवर्षी जमा करावी लागेल. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कुणीही शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात. वयाच्या हिशोबाने शेतकऱ्यांनी दर महिन्याला विम्याचा हप्ता म्हणून जमा करावी लागणारी रक्कम निश्चित केली जाते. ही रक्कम ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत येते. या पेन्शन फंडची भारतीय जीवन विमान निगमकडून देखरेख केली जात आहे.
पीएम किसान मानधन योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचं वय १८ वर्षांपासून २९ वर्षांपर्यंत आहे. त्यांना ५५ रुपयांपासून १०९ रुपये हप्ता जमा करावे लागतील. तर ३० वर्षांपासून ३९ वर्षांपर्यंतच्या शेतकऱ्यांना दरमहा ११० रुपयांपासून १९९ रुपयांदरम्यान हप्ता द्यावा लागेल.
त्याशिवाय जे शेतकरी ४० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांना दरमहा २०० रुपये हप्ता द्यावा लागेल. जेव्हा शेतकऱ्याचं वय ६० वर्षे होईल, तेव्हा सरकारकडून दर वर्षी ३६ हजार रुपये आणि दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील.