शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 07:43 IST

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना पत्र लिहून या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने 59 चिनी अ‍ॅप्स कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने या चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना बंदीचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोदी सरकारने 29 जूनला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व आणि एकात्मतेसाठी धोका दर्शविणार्‍या टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना पत्र लिहून या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, या चिनी अ‍ॅप्सवर सार्वभौमत्व आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत बंदी घातली गेली आहे.

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे. बंदी असूनही ही चिनी अ‍ॅप्स भारतात कोणत्याही प्रकारे वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिली गेली तर ती कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल. त्यामुळे या प्रकरणात दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. सुत्रांनी सांगितले की, या चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान,  भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाईल आणि अ‍ॅप्सवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही चिनी अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

आणखी बातम्या...

आता चीनच्या अडचणी वाढणार, मोदी सरकार नवीन नियम लागू करणार

बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

टॅग्स :Chinese Appsचिनी ऍपIndiaभारतchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकार