सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:13 IST2018-09-09T06:46:50+5:302018-09-09T07:13:56+5:30
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली असून, या सरकारमुळे देशातील शेतकरी व तरुण वर्ग अडचणीत आला आहे, असे प्रतिपादन केले आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कोणतीच आश्वासने पूर्ण न केल्याने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे.
दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. किंबहुना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी कमी झाल्या, अशी टीका करून ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’ या राबविण्यातही मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले नाही. त्यामुळे जनता आता पर्यायांचा विचार करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. शेतकºयांचे प्रश्न सरकारने वाढवून ठेवले आहेत, असे सांगून, शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंधही सरकारने बिघडविल्याचा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. या समारंभास माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही उपस्थित होते.
>नाकर्तेपणाचा हा आरसा
कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाविषयी डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, मोदी सरकारचे संपूर्ण विश्लेषण या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे, खºया अर्थाने केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसाच आहे.